महाराष्ट्रात पुन्हा धुवाधार ! 21 ते 25 जुलै दरम्यान पावसाची धुवाधार बॅटिंग, मुंबई-कोकणसह 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा - टॉप न्यूज मराठी

महाराष्ट्र : 1 जुलै ते 8 जुलै या कालावधीत महाराष्ट्रात पावसानं धुवाधार बॅटिंग केली. यामुळे राज्यातील अनेक धरणे निम्म्यापेक्षा जास्त भरली. त्यानंतर अचानक पावसानं काढता पाय घेतला आणि उन्हाचे चटके बसू लागले होते.

मात्र आता पुन्हा एकदा पाऊस जोरदार बॅटिंग करणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्या जिल्ह्यांना किती धोका?

 भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 21 ते 25 जुलै दरम्यान नैऋत्य मोसमी वारे गुजरात आणि उत्तर महाराष्ट्रावर सक्रिय राहणार आहेत.

ऑरेंज अलर्ट - मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस

 मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सातारा घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसर, अकोला, अमरावती आणि बुलढाणा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आणि ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

यलो अलर्ट - मुसळधार पाऊस

 सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट आहे.

 पुणे, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्येही हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

1. मुंबई आणि उपनगर: 21 ते 23 जुलै दरम्यान मुसळधार पाऊस. 21 जुलैला संध्याकाळी 4:53 वाजता 3.64 मीटर उंचीची भरती आहे, त्यामुळे सखल भागात पाणी साचण्याची शक्यता.

2. कोकण आणि घाट परिसर : महाबळेश्वरमध्ये 24 तासात 400 मिमी पाऊस नोंदवला गेला. भूस्खलन आणि पूरस्थितीचा धोका देखील संभवतो .

3. सतारा जिल्हा : रेड अलर्ट जारी.

नागरिकांसाठी सूचना

आजपासून पुढील 3 ते 4 दिवस महाराष्ट्रात अलर्ट जारी करण्यात आला आहे. विशेषतः कोकण किनारपट्टी आणि घाट परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे. वाऱ्याचा वेग जास्त राहण्याची शक्यता असून, मेघगर्जनेसह विजांचा कडकडाटही होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.