आगीच्या ज्वाळांनी उद्ध्वस्त केले कुटुंब; दिल्ली हॉटेल दुर्घटनेत 21 जणांचा मृत्यू - टॉप न्यूज मराठी

दिल्लीत हॉटेलमध्ये भीषण आग लागून 21 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. 11 विदेशी नागरिकांचा समावेश आहे. 

दक्षिण दिल्लीतील मालवीय नगर परिसरातील हौज राणी येथील ‘लेमन ग्रीन’ हॉटेलमध्ये बुधवारी लागलेल्या भीषण आगीत 21 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 11 विदेशी नगरिकांचाही समावेश आहे. तपासात हॉटेल परवानगीपेक्षा चौपट क्षमतेने चालवले जात असल्याचे समोर आले. त्याला आगणीसुरक्षा परवानगी नसल्याचे व इमारतीवर बेकायदेशीर अतिरिक्त मजले बांधण्यात आल्याचे समोर आले. या दुर्घटनेत 40हून अधिक लोकं जखमी झाले आहेत. त्यामधील काही लोकांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. 

2010 मध्ये राष्ट्रकुल खेळांदरम्यान सरकारच्या ‘बेड अँड ब्रेकफास्ट’ योजनेअंतर्गत या हॉटेलला परवानगी देण्यात आली होती. या हॉटेलला सहा खोल्या बांधण्याची परवानगी देण्यात आली होती. पण प्रत्येकशात 24 खोल्या बांधल्याचे दिसून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनेतील मृतांच्या वरसदारांना प्रत्येक 2 लाख आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. 

या आगीत एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. गुरग्राम येथील रहिवासी सीए विवेक अग्रवाल यांच्या कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू झाला आहे. आपल्या वडिलांना भेटण्यासाठी विवेक अग्रवाल संपूर्ण कुटुंबासोबत दिल्लीत आले होते. विवेक अग्रवाल यांचे 80 वर्षीय वडील राधे श्याम अग्रवाल यांच्यावर दिल्लीत मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वडिलांना भेटण्यासाठी विवेक अग्रवाल, त्यांची पत्नी तर्जनी अग्रवाल, दोन मुलींसह इतर चार नातेवाईकांना घेऊन दिल्लीला आले होते. त्यांनी या हॉटेलमध्ये दोन खोल्या बूक केल्या होत्या. बुधवारी सकाळी ही सर्वजण हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करत असताना अचानक हॉटेलला भीषण आग लागली. या आगीत विवेक यांच्यासह कुटुंबातील सर्व आठ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर आता या कुटुंबात केवळ त्यांचे 80 वर्षाचे वडील आहेत जे की आता एकटे पडले आहेत.

दिल्ली सरकारच्या ‘बेड अँड ब्रेकफास्ट’ योजनेअंतर्गत फक्त 6 खोल्यांची मान्यता होती परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नियमांचे उल्लंघन करून या इमारतीत बेसमेंटसह तब्बल 25 खोल्या बेकायदेशीरपणे चालवल्या जात होत्या. या निष्काळजीपणामुळे 21 जाणांने त्यांचा जीव गमावला आहे असा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.     

#topnewsmarathi #topnews #breakingnews #delhifirenews