तलाठी भरती 2026 : MPSC कडून 1539 जागांची जाहिरात, परीक्षा 25 ऑक्टोबरला, पात्रता काय ? संपूर्ण माहिती - टॉप न्यूज मराठी

तलाठी भरती 2026 : तलाठी भरती 2026 ची वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC ने ग्रुप-C सेवा संयुक्त परीक्षा 2026 मध्ये तलाठी पदाच्या 1539 जागा समाविष्ट केल्या आहेत.

MPSC ने जाहिरात क्रमांक 017/2026 नुसार एकूण 5707 जागांसाठी भरती काढली आहे, त्यात 1539 जागा या तलाठी म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी पदाच्या आहेत. महसूल आणि वन विभागासाठी ही भरती होणार आहे. 

महत्वाच्या तारखा -

अर्ज प्रक्रिया 26 जून 2026 पासून सुरू झाली होती. शेवटची तारीख 5 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढवण्यात आली होती. आता अर्ज बंद झाले आहेत.

परीक्षा तारीख - MPSC ग्रुप-C पूर्व परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 रोजी Offline OMR पद्धतीने होणार आहे.

पात्रता काय लागेल ?

1. शैक्षणिक पात्रता - कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. अंतिम वर्षाचे विद्यार्थी पात्र नाहीत, पदवी पूर्ण असणे गरजेचे आहे.

2. वयोमर्यादा - 18 ते 38 वर्षे.

3. भाषा - मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

4. संगणक पात्रता - MS-CIT किंवा समकक्ष सर्टिफिकेट आवश्यक आहे, पण अर्ज करताना नसेल तरी नंतर सादर करण्याची सूट मिळते.

5. महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच Domicile असणे बंधनकारक आहे.

पगार किती मिळणार ?

तलाठी पदासाठी वेतनश्रेणी 25,500 ते 81,100 रुपये इतकी आहे. 

निवड प्रक्रिया आणि परीक्षा पॅटर्न

निवड लेखी परीक्षा आणि कागदपत्र पडताळणीने होईल. परीक्षेत एकूण 100 प्रश्न असतील, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, एकूण 200 गुण, वेळ 2 तास आणि निगेटिव्ह मार्किंग नाही.

विषय - मराठी 25 प्रश्न, इंग्रजी 25 प्रश्न, सामान्य ज्ञान 25 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणी 25 प्रश्न.

काम काय असते?

तलाठी हा गाव पातळीवरील महसूल अधिकारी असतो. 7/12 उतारे, 8A नोंदी ठेवणे, जमीन महसूल गोळा करणे, उत्पन्न, जात, रहिवासी दाखले देणे ही मुख्य कामे आहेत.