महाडीबीटी स्कॉलरशिप 2026-27 : अर्ज सुरू झाले, 10वी, 12वी, डिग्रीच्या मुलांना 50 हजारांपर्यंत मिळणार, शेवटची तारीख कधी? - टॉप न्यूज मराठी

महाराष्ट्र सरकारने महाडीबीटी म्हणजेच आपले सरकार DBT पोर्टलवर 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी स्कॉलरशिपचे अर्ज सुरू केले आहेत. या पोर्टलवर आता एकूण 68 स्कॉलरशिप उपलब्ध आहेत - 54 स्कॉलरशिप कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी आणि 14 स्कॉलरशिप शाळेतील विद्यार्थ्यांसाठी. 12 वेगवेगळ्या विभागांच्या स्कॉलरशिप एकाच ठिकाणी मिळतात.

महत्वाच्या तारखा

2026-27 साठी अर्ज सुरू होण्याची तारीख - 1 जून 2026 पासून सुरू झाले आहेत.

शेवटची तारीख - साधारणपणे ऑक्टोबर / नोव्हेंबर 2026 पर्यंत असते, पण विभागानुसार बदलते. काही स्कॉलरशिपसाठी 30 सप्टेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यामुळे लवकर अर्ज करा. 

कोण पात्र आहे? 50 हजार कसे मिळणार?

1. महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे - Domicile प्रमाणपत्र लागेल.

2. 10वी आणि 12वी मध्ये किमान 60% मार्क्स असणे गरजेचे आहे.

3. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाख ते 8 लाखाच्या आत असावे, योजनेनुसार उत्पन्नाची अट बदलते.

4. SC, ST, OBC, VJNT, SBC, SEBC, EBC आणि अल्पसंख्याक प्रवर्गातील विद्यार्थी पात्र आहेत. 

स्कॉलरशिपची रक्कम किती?

योजनांनुसार रक्कम वेगळी आहे.

- राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती - 12वी नंतर डिग्रीसाठी 100% फी माफी

- पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता - दरवर्षी 20 हजार ते 50 हजारांपर्यंत

- अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी 25 हजार पर्यंत

लागणारी कागदपत्रे

आधार कार्ड जे बँक खात्याला लिंक आहे, Domicile, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला तहसीलदाराचा, मागील वर्षाची मार्कशीट, कॉलेज प्रवेश पावती, बँक पासबुक, फोटो

अर्ज कसा करायचा?

1. अधिकृत वेबसाईट mahadbt2.maharashtra.gov.in वर जा - जुनी वेबसाईट आता याच नवीन पोर्टलवर Redirect होते.

2. Applicant Login Here वर क्लिक करून New Applicant Registration करा.

3. आधार नंबर टाकून OTP Verification करा.

4. सर्व माहिती भरा आणि कागदपत्रे 5 KB ते 256 KB मध्ये अपलोड करा.

5. All Schemes मध्ये जाऊन तुम्हाला लागू असलेली स्कीम निवडा आणि Apply करा.

6. अर्जाचा प्रिंट काढून कॉलेजमध्ये जमा करा, कॉलेज प्रिन्सिपल तुमचा अर्ज Verify करतील. 

एक महत्वाची टीप - तुमचे आधार कार्ड बँक खात्याला DBT Enable असणे गरजेचे आहे, नाहीतर पैसे जमा होणार नाहीत. आणि अर्जाची स्थिती त्याच लॉगिनने तुम्ही चेक करू शकता.