महाराष्ट्र पोलीस भरती 2026 मध्ये 15,631 पदांसाठी भरती सुरू आहे आणि सगळ्यात आधी फिजिकल टेस्ट होते. लेखी परीक्षा नंतर होते, त्यामुळे ग्राउंड पास होणे सगळ्यात महत्वाचे आहे.
ग्राउंडमध्ये 2 भाग असतात
1. शारीरिक मोजमाप चाचणी - PST
मुलांसाठी - उंची 165 सेमी लागते, राखीव प्रवर्गासाठी 160 सेमी. छाती न फुगवता 79 सेमी आणि फुगवून 84 सेमी लागते.
मुलींसाठी - उंची 155 सेमी लागते, राखीव प्रवर्गासाठी 150 सेमी. वजन उंचीनुसार असावे. छातीची अट नाही.
2. शारीरिक क्षमता चाचणी - PET - यात 50 मार्क आहेत
ही टेस्ट आता RFID चिप आणि CCTV मध्ये होते, त्यामुळे वेळेत फसवणूक होत नाही.
मुलांसाठी ग्राउंड :
- 100 मीटर धावणे - 16 सेकंदात
- 1600 मीटर धावणे - हा मुख्य इव्हेंट आहे. यासाठी तुम्हाला 6 मिनिट 30 सेकंद ते 7 मिनिटांच्या आत पूर्ण करावे लागते. काही जिल्ह्यांमध्ये 1600 मीटरसाठी 30 मिनिटांची वेळ सांगितली जाते पण तो क्वालिफायिंग टाइम आहे, चांगले मार्क्स मिळवण्यासाठी 6.30 च्या आत पळावे लागते. यावर 30 मार्क आहेत.
- गोळाफेक - 7.26 किलोचा गोळा कमीत कमी 4.5 मीटर फेकावा लागतो. यावर 20 मार्क.
मुलींसाठी ग्राउंड आणि नवीन नियम :
- 100 मीटर धावणे - 18 सेकंदात
- 800 मीटर धावणे - हा मुख्य इव्हेंट आहे. 4 मिनिटात पूर्ण करावे लागते. मुलींना 1600 मीटर नसते, फक्त 800 मीटर असते. हा नियम अनेक वर्षांपासून आहे.
- गोळाफेक - 4 किलोचा गोळा कमीत कमी 4 मीटर फेकावा लागतो.
नवीन नियम काय आला आहे ?
1. ट्रान्सजेंडर उमेदवारांसाठी - महाराष्ट्र सरकारने नवीन नियम काढला आहे. स्वतःला महिला म्हणून ओळखणाऱ्या उमेदवारांसाठी उंची 158 सेमी आणि धावणे 800 मीटर असेल, तर स्वतःला पुरुष म्हणून ओळखणाऱ्यांसाठी 165 सेमी आणि 1600 मीटर असेल.
2. सकाळी लवकर ग्राउंड - उन्हामुळे एका उमेदवाराचा मृत्यू झाल्यानंतर आता ग्राउंड सकाळी 5 ते 9 आणि संध्याकाळी 5 नंतर घेतले जात आहे. दुपारी ग्राउंड होत नाही.
3. रिपोर्टिंग टाइम - हॉल तिकीटवर 6 वाजता लिहिलेले असेल तरी 4.30 वाजताच पोहोचा. कारण बॅच पहिले लागल्यास थंडी आणि कमी धुळीमुळे धावणे सोपे जाते.
तयारी कशी करावी ?
- ग्राउंडच्या 3-4 महिने आधी तयारी सुरू करा. रोज सकाळी धावण्याचा सराव करा.
- रिकाम्या पोटी धावू नका. ग्राउंडच्या 45 मिनिटे आधी केळी किंवा खजूर खा.
- चांगले स्पोर्ट्स शूज वापरा.