नवरात्र उत्सव 2026 : उद्या आहे घटस्थापना ! पहिल्या माळेचे महत्व काय ? - टॉप न्यूज मराठी

शारदीय नवरात्र 2026 ची सुरुवात उद्यापासून होत आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसात नऊ वेगवेगळ्या रंगांचे कपडे घालण्याची परंपरा आहे. उद्या पहिली माळ आहे आणि पहिल्या दिवसाच्या रंगाबद्दल सगळ्यांना उत्सुकता आहे.

2026 मध्ये पहिल्या माळेचा म्हणजेच पहिल्या दिवसाचा शुभ रंग पांढरा आहे.

पांढरा रंग का शुभ आहे?

पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते. शैलपुत्री देवीने पांढरे वस्त्र परिधान केलेले असते. तिच्या कपाळावर चंद्र आहे आणि ती बैलावर बसलेली असते. पांढरा रंग हा शांतता, पवित्रता आणि शुद्धतेचे प्रतीक मानला जातो. पांढरे कपडे घातल्याने मन शांत राहते आणि देवी प्रसन्न होते असे मानले जाते.

पांढऱ्या रंगाचे महत्व काय?

ज्योतिष शास्त्रानुसार पांढरा रंग चंद्र ग्रहाशी संबंधित आहे. पहिली माळ शैलपुत्री देवीची आहे आणि शैलपुत्री देवीचा संबंध चंद्राशी आहे. त्यामुळे पांढरा रंग घातल्याने चंद्र दोष दूर होतो आणि मन स्थिर होते.

उद्या काय करावे?

उद्या सकाळी घटस्थापना केल्यानंतर पांढऱ्या रंगाचे कपडे घालून देवीची पूजा करावी. शक्य असेल तर देवीला पांढरी फुले अर्पण करावीत. पांढरा रंग हा नवीन सुरुवातीचा रंग देखील मानला जातो, त्यामुळे या दिवशी नवीन कामाची सुरुवात करणे शुभ मानले जाते.

या वर्षीचे नऊ रंग कोणते?

पहिला दिवस - पांढरा

दुसरा दिवस - लाल

तिसरा दिवस - निळा

चौथा दिवस - पिवळा

पाचवा दिवस - हिरवा

सहावा दिवस - राखाडी

सातवा दिवस - केशरी

आठवा दिवस - मोरपंखी

नववा दिवस - गुलाबी

नवरात्री म्हणजे या नऊ दिवसात स्त्री शक्तीचा जागर करावा. मनात या नऊ दिवसांमध्ये येणारे अविचार , दुसऱ्यासाठी आणि विशेषकरून स्वतःसाठी अपशब्द टाळावेत. मांसहार आणि मद्यपान टाळावे. एकावेळी पूर्ण नऊ दिवस उपवास करणे जरी जमले नाही तरी आपल्यातील अपप्रवृत्तीना संपवण्यासाठी मातेची उपासना करावी.