रंजक रोचक : जगातील असे गाव जिथे 200 वर्षांपासून कोणीही भांडण केले नाही, कारण आहे विचित्र कायदा.. - टॉप न्यूज मराठी

रंजक रोचक : जगात जिथे पाहावे तिथे छोट्या छोट्या कारणांवरून भांडणे होतात. शेजाऱ्याशी भांडण, जमिनीवरून वाद, असे प्रकार रोज घडतात. पण जगात एक असे गाव आहे जिथे गेल्या 200 वर्षांपासून एकही भांडण झालेले नाही. पोलिस स्टेशन नाही, कोर्ट कचेरी नाही, तरीही सगळे लोक गुण्यागोविंदाने राहतात. या गावाचा विचित्र कायदा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.

हे गाव आहे जपानमधील शिराकावा. या गावाला युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा दिला आहे. इथे फक्त 600 लोक राहतात. या गावात 200 वर्षांपासून कोणत्याही दोन लोकांमध्ये मोठे भांडण झालेले नाही. याचे कारण इथला एक जुना कायदा आहे.

या गावात एक विचित्र नियम आहे, जर दोन लोकांमध्ये भांडण झाले तर दोघांनाही गाव सोडावे लागते. भांडण कोणामुळे सुरू झाले हे पाहिले जात नाही. शिक्षा दोघांनाही सारखीच. जो भांडेल तो गावाबाहेर. हा नियम 200 वर्षांपूर्वी गावच्या प्रमुखाने बनवला होता. त्यावेळी गावात सतत भांडणे होत होती. म्हणून त्याने हा कडक निर्णय घेतला.

सुरुवातीला लोकांना हा नियम खूप विचित्र वाटला. पण हळूहळू लोकांना त्याचे महत्त्व कळले. भांडण झाले की दोघांचेही नुकसान होणार म्हणून लोक भांडणच टाळू लागले. कोणी रागावले तरी दुसरा माणूस शांत राहतो आणि नंतर बसून बोलून प्रश्न सोडवतात.

या गावात भांडण सोडवण्यासाठी एक वेगळी पद्धत आहे. संध्याकाळी गावच्या मध्यभागी असलेल्या मोठ्या झाडाखाली सगळे जमा होतात. ज्याचे काही भांडण असेल तो तिथे सांगतो. पण भांडणाच्या भाषेत नाही तर शांतपणे. गावातील वयस्कर लोक दोघांचेही म्हणणे ऐकून घेतात आणि तोडगा काढतात. इथे कोणीही आवाज चढवून बोलत नाही.

या गावातील लोकांचा असा विश्वास आहे की भांडणामुळे घरातील सुख शांती जाते. म्हणून ते रागावर नियंत्रण ठेवतात. लहान मुलांनाही लहानपणापासून हेच शिकवले जाते की भांडण करण्यापेक्षा बोलून प्रश्न सोडवा.

या नियमामुळे गावात आणखी एक फायदा झाला आहे. इथे चोरी, मारामारी असे प्रकारही होत नाहीत. कारण लोकांना माहिती आहे की काही चुकीचे केले तर गाव सोडावे लागेल. आणि या गावातील लोकांना आपले गाव खूप प्रिय आहे. निसर्गाच्या कुशीत असलेले हे गाव सोडून जायला कोणीही तयार होत नाही.

आजच्या काळात जिथे लोक छोट्या कारणावरून नाते तोडतात, तिथे हे गाव जगासाठी एक उदाहरण आहे. 200 वर्षे कोणतेही भांडण न होणे ही साधी गोष्ट नाही. यावरून हे समजते की कडक कायदा नाही तर समजूतदारपणा जास्त महत्त्वाचा असतो.

तुम्हाला काय वाटते, असा कायदा आपल्या गावात किंवा सोसायटीत लागू केला तर भांडणे थांबतील का?