उपोषणाचा 20 वा दिवस ! "20 जुलै पर्यंत कोणत्याही परिस्थितीत जिवंत राहायचंय ! लोकशाहीच्या मंदिरात विचार मांडू " वांगचुक नेमकं काय म्हणाले - टॉप न्यूज मराठी

नवी दिल्ली : शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या प्रमुख मागणीसाठी सोनम वांगचुक हे उपोषणाला बसले आहेत. आज उपोषणाचा विसावा दिवस आहे. आतापर्यंत त्यांचं नऊ किलो वजन कमी झाला आहे. आपल्या समर्थकांशी बोलताना वांगचुक आज म्हणाले की, 20 जुलै पर्यंत कोणत्याही परिस्थितीत जिवंत राहायचं आहे. 20 जुलै रोजी संसदेवर शांततापूर्ण मोर्चा काढण्यासाठी मोठ्या संख्येने एकत्र येण्याचा आवाहन त्यांनी केलं. 

नीट पेपर फुटी आणि परीक्षेतील अनियमिततेवरून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सोनम वांगचुक यांनी केले आहे. दरम्यान 20 जुलै रोजी संसदेवर शांततापूर्ण मोर्चा काढून लोकशाहीच्या मंदिरात आपण आपले विचार मांडू असे ते म्हणाले. यावेळी समर्थकांशी बोलताना ते म्हणाले आहेत की बाहेरून कमजोर असलो तरी आतून खंबीर आहे. 20 जुलैचा मोर्चा यशस्वी न झाल्यास आपण भूत म्हणून परत येऊ. अशा विनोदी शब्दात समर्थकांना त्यांनी काहीसा दिलासा दिला. परंतु वांगचुक यांच्या तब्येतीमुळे त्यांचे समर्थक चिंतेत आहेत. 

वीस दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे. त्यामुळे वांगचुक यांची प्रकृती मोठ्या प्रमाणावर खालवली आहे. नऊ किलो वजन कमी झाले असून डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे अवयव त्यामुळे हळूहळू निकामी होऊ लागतील. दरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र आणि दिल्ली सरकारला गरज भासल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घेण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु वांगचुक यांनी केलेल्या मागणीबाबत नेमका काय निर्णय होतो याचे संकेत अद्याप मिळू शकले नाही.