पुस्तक वाचण्याची सवय कशी लावावी, दिवसाला 20 मिनिटे वाचून आयुष्य कसे बदलते - टॉप न्यूज मराठी

आजच्या मोबाईल आणि रिल्सच्या जमान्यात पुस्तक वाचणे ही सवय हळूहळू कमी होत चालली आहे. पण जी माणसे आज यशस्वी आहेत त्यांच्यात एक गोष्ट समान आहे ती म्हणजे वाचनाची सवय. दिवसाला फक्त 20 मिनिटे पुस्तक वाचूनही तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलू शकते.

पुस्तक वाचण्याची सवय का लागते नाही

अनेक जण म्हणतात आम्हाला वाचायला वेळच मिळत नाही किंवा वाचायला घेतले की झोप येते. याचे मुख्य कारण म्हणजे आपण सुरुवातीलाच खूप जड आणि मोठी पुस्तके वाचायला घेतो. वाचनाची सवय लावायची असेल तर सुरुवात अगदी छोटी ठेवावी लागते.

पुस्तक वाचण्याची सवय कशी लावावी

1. दिवसाला फक्त 20 मिनिटांचा नियम ठरवा

सुरुवातीला एक तास वाचायचे असे मोठे टार्गेट ठेवू नका. रोज सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपण्यापूर्वी फक्त 20 मिनिटे वाचन करा. 20 मिनिटे म्हणजे साधारण 10 ते 15 पाने. हा नियम सलग 21 दिवस पाळला तर आपोआप सवय लागते.

2. आवडीच्या विषयापासून सुरुवात करा

तुम्हाला ज्या विषयात रस आहे त्याच विषयाचे पुस्तक घ्या. कुणाला कथा आवडतात, कुणाला आत्मचरित्र आवडते, कुणाला शेती विषयक पुस्तके आवडतात. आवडत्या विषयापासून सुरुवात केल्यास कंटाळा येत नाही.

3. मोबाईल दूर ठेवा

वाचायला बसताना मोबाईल सायलेंट करून दुसऱ्या खोलीत ठेवा. अनेक वेळा नोटिफिकेशनमुळे वाचनात खंड पडतो आणि मग पुन्हा वाचायचा कंटाळा येतो.

4. एक छोटी लायब्ररी तयार करा

घरात एक छोटा कोपरा वाचनासाठी राखून ठेवा. तिथे 5 ते 10 पुस्तके ठेवा. पुस्तके डोळ्यासमोर असली की वाचण्याची इच्छा होते. सुरुवातीला विकत घेण्यापेक्षा जवळच्या ग्रंथालयाचे सभासद व्हा. तिथे हजारो पुस्तके अगदी कमी पैशात वाचायला मिळतात.

5. वाचलेले लिहून काढा

जे वाचले ते एका छोट्या वहीत दोन ओळीत लिहून काढा. यामुळे लक्षात राहते आणि विचार करण्याची सवय लागते.

दिवसाला 20 मिनिटे वाचून आयुष्य कसे बदलते

1. विचार करण्याची पद्धत बदलते - पुस्तक वाचल्याने नवीन शब्द, नवीन विचार कळतात. कोणताही निर्णय घेताना आपण जास्त चांगल्या पद्धतीने विचार करू लागतो.

2. ताण तणाव कमी होतो - संशोधनानुसार 20 मिनिटे पुस्तक वाचल्याने 68 टक्के ताण कमी होतो. मोबाईल पाहिल्याने डोके जड होते पण पुस्तक वाचल्याने मन शांत होते.

3. बोलण्यात आत्मविश्वास येतो - रोज वाचल्याने शब्दसंग्रह वाढतो. चार लोकांमध्ये बोलताना आत्मविश्वास येतो. मुलाखत किंवा स्पर्धा परीक्षेत याचा खूप फायदा होतो.

4. झोप चांगली लागते - रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल ऐवजी पुस्तक वाचले तर झोप लवकर आणि गाढ लागते.

5. यशस्वी लोकांची सवय लागते - वॉरेन बफे, बिल गेट्स, डॉ. एपीजे अब्दुल कलाम हे सर्व मोठे लोक दिवसाला तासभर वाचन करतात. वाचनामुळे ज्ञान वाढते आणि ज्ञानातूनच पैसा आणि यश मिळते.

कोणती पुस्तके वाचावीत

विद्यार्थ्यांनी सुरुवातीला चांगल्या लेखकांची छोटी पुस्तके वाचावीत. उदाहरणार्थ वपु काळे, डॉ. कलाम यांची पुस्तके, शिवाजी महाराजांवरील पुस्तके, यशोगाथा सांगणारी पुस्तके. एकदा गोडी लागली की मग मोठी पुस्तके आपोआप वाचली जातात.

शेवटी एकच लक्षात ठेवा, मोबाईलवर स्क्रोल करण्यात दिवसाचे 2 तास कसे जातात हे कळत नाही पण 20 मिनिटे पुस्तक वाचल्याने आयुष्यभराचे ज्ञान मिळते. आजपासूनच 20 मिनिटांचा नियम सुरू करा.