ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकताच एक डार्क कॉमेडी थ्रिलर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये माधुरी दीक्षित, तृप्ती डिमरी आणि धारणा दुर्गा मुख्य भूमिका साकारत आहेत
नेटफ्लिक्स ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला नवीन वेबसिरीस आणि चित्रपट आपल्या भेटीला येतात. गुरुवारी म्हणजेच काल 4 जूनला असाच एक नवीन चित्रपट आपल्या भेटीला नेटफ्लिक्सवर ऑनलाइन स्ट्रीम करण्यात आला. 2 तास 7 मिनिटांचा ह्या चित्रपटाने येताच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.
4 जून 2026 रोजी प्रदर्शित झालेल्या हा चित्रपट डार्क कॉमेडी थ्रिलर या जॉनराकहाा आहे. खरं तर चाहते ह्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. यामध्ये माधुरी दीक्षित, तृप्ती डिमरी आणि धारणा दुर्गा या मुख्य भूमिकेत आहेत. प्रदर्शनानंतर हा चित्रपट अपेक्षांवर खरा उतरल्याचं दिसतंय.
या चित्रपटाचे दिग्दर्शन सुरेश त्रिवेणी यांनी केलं आहे. चित्रपटाची कथा खूपच रंजक आणि लोकांच मनोरंजन करणारी आहे. यामध्ये एक विधवा आई आणि तिच्या दोन मुलींची कहाणी दाखवण्यात आली आहे. रेखा(माधुरी दीक्षित) ही एक बिनधास्त आणि मोहक आई दाखवली आहे, तिच्या या स्वभावामुळे समाज तिला एक संशयच्या नजरेने बघत असतो. कथेत ट्विस्ट तेव्हा येतो जेव्हा त्यांच्या घरातील किचनमध्ये शेजारच्याच मृतदेह आढळतो.
तो मृतदेह लपवण्यासाठी आई आणि दोघी मुली मिळून काय काय करतात आणि किती अडथळ्यांना सामोरे जातात, याची रंजक आणि शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी कथा ‘मां बहन’ मध्ये पहायल मिळते. चित्रपटात आई आणि मुली यांच्यामधील एक भन्नाट नातं आपण बघू शकतो. त्यासोबतच या चित्रपटात समाजासाठी एक गंभीर आणि तितकाच संवेदनशील मुद्दासुद्धा मांडण्यात आला आहे.
या चित्रपटाने नेटफ्लिक्सवर येताच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. यामध्ये माधुरी दीक्षित, तृप्ती डिमरी आणि धारणा दुर्गा यांच्यासोबत रवी किशन, गीतांजली कुलकर्णी, अरुणोदय सिंह, शार्दुल भारद्वाज यांच्याही भूमिका आहेत.
#topnewsmarathi #trendin #topnews #bollywood #entertainment