पॅन कार्ड आणि आधार लिंक करणे सरकारने बंधनकारक केले आहे. जर तुम्ही अजूनही तुमचे पॅन आधारला लिंक केले नसेल तर तुमचे पॅन कार्ड बंद होऊ शकते आणि तुम्हाला 1000 रुपये दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे लिंक आहे की नाही हे एकदा नक्की चेक करा.
लिंक आहे की नाही असे चेक करायचे
सगळ्यात आधी इन्कम टॅक्सच्या अधिकृत वेबसाईटवर जा. http://www.incometax.gov.in ही वेबसाईट ओपन करा. होम पेजवरच तुम्हाला Quick Links मध्ये Link Aadhaar Status असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
तिथे तुम्हाला तुमचा पॅन नंबर आणि आधार नंबर टाकायचा आहे. दोन्ही नंबर टाकल्यानंतर View Link Aadhaar Status वर क्लिक करा. तुमचे पॅन आधारला लिंक आहे की नाही हे लगेच स्क्रीनवर दिसेल. जर Already Linked असा मेसेज आला तर टेन्शन नाही, तुमचे काम झाले आहे.
जर लिंक नसेल तर काय करायचे
जर लिंक नसेल तर त्याच वेबसाईटवर Link Aadhaar वर क्लिक करा. पॅन नंबर, आधार नंबर टाका आणि मोबाईलवर आलेला ओटीपी टाका. याआधी तुम्हाला 1000 रुपये दंड भरावा लागेल. ई-पे टॅक्स मध्ये जाऊन हा दंड ऑनलाईन भरता येतो. दंड भरल्यानंतरच लिंकची प्रोसेस पूर्ण होते.
पॅन आधारला लिंक नसेल तर बँकेचे व्यवहार, शेअर मार्केट, आयटीआर फाईल करणे अशा कामांमध्ये अडचण येते. त्यामुळे आजच चेक करून घ्या.