मोठी बातमी : गोकुळ दूध संघाचा नवा अध्यक्ष आज ठरणार ! दुपारी 2 वाजता नाव जाहीर होणार - टॉप न्यूज मराठी

महाराष्ट्र : कोल्हापूरमधील गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक आज होत आहे. दुपारी 12 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत सभा सुरू होणार आहे. गोकुळ दूध संघाजवळील गोकुळ चौकात यासाठी मंडप उभारण्यात आला आहे. या सभेनंतर दुपारी 2 च्या सुमारास नव्या अध्यक्षाचे नाव समोर येण्याची शक्यता आहे.

या निवडणुकीत दोन गटांमध्ये थेट लढत होत आहे. सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीकडून शशिकांत पाटील चुयेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश पाटील हे मैदानात आहेत.

राजेश पाटील हे चंदगडचे माजी आमदार आहेत. त्यांना हसन मुश्रीफ आणि अजित पवार यांचे विश्वासू मानले जाते. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यांचे वडील नरसिंग गुरुनाथ पाटील हे देखील आमदार होते. अजित पवार मुख्यमंत्री होईपर्यंत फेटा बांधणार नाही, असा निर्धार त्यांनी केला होता, यामुळे ते चर्चेत आले होते.