पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसंदर्भातील तक्रारी 1950 वर नोंदवा; सहायक निवडणूक अधिकारी यांचे आवाहन - टॉप न्यूज मराठी

पुणे : पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रियेसंदर्भात कोणतीही तक्रार, अडचण किंवा आक्षेप असल्यास नागरिकांनी जिल्हा निवडणूक शाखेच्या १९५० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेत मतदार, उमेदवार तसेच संबंधित घटकांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी निवडणूक प्रशासनामार्फत आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. निवडणूक प्रक्रियेशी संबंधित कोणतीही बाब निदर्शनास आल्यास ती तातडीने निवडणूक प्रशासनाच्या निदर्शनास आणून देणे आवश्यक आहे.

निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता, निष्पक्षता आणि शिस्त कायम राहण्यासाठी नागरिकांनी आपल्या तक्रारी अथवा सूचना १९५० या हेल्पलाइन क्रमांकावर नोंदवाव्यात. तसेच तक्रारींची नोंद करताना संबंधित घटनेची आवश्यक माहिती उपलब्ध करून द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्याच्या निवडणूक शाखेच्या संकेतस्थळावर पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भातील आवश्यक माहिती, मतदार याद्या आणि निवडणूकविषयक प्रसिद्धीपत्रके उपलब्ध करून देण्यात आली आहेत.