महत्वाची बातमी : आज विधान परिषदेच्या पाच जागांसाठी मतदान, 182 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार - टॉप न्यूज मराठी

महाराष्ट्र : आज महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागांसाठी मतदान होत आहे. यात पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर असे तीन पदवीधर मतदारसंघ आणि पुणे, अमरावती असे दोन शिक्षक मतदारसंघ आहेत. सकाळी 8 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मतदान चालणार आहे.

या पाचही जागांवर एकूण 182 उमेदवार रिंगणात आहेत. पुणे पदवीधरमध्ये सर्वाधिक 47, संभाजीनगर पदवीधरमध्ये 41, नागपूर पदवीधरमध्ये 38, पुणे शिक्षकमध्ये 30 आणि अमरावती शिक्षकमध्ये 26 उमेदवार आहेत.

राज्यात एकूण 10 लाख 68 हजार मतदार मतदान करणार असून 2419 मतदान केंद्रे उभारली आहेत. पुणे पदवीधरमध्ये 3 लाख 88 हजार तर अमरावती शिक्षकमध्ये सर्वात कमी 35 हजार मतदार आहेत. नागपूरमध्ये भाजपचे सुधाकर कोहळे विरुद्ध काँग्रेसचे अभिजीत वंजारी, पुण्यात भाजपच्या स्मिता जाधव विरुद्ध शरद पवार गटाच्या हर्षदा देशमुख यांच्यात प्रमुख लढत आहे. बंडखोर आणि अपक्षांमुळे चुरस वाढली आहे. मतमोजणी 27 ऑक्टोबर रोजी होणार आहे.