बिगुल वाजला ! विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर; कधी होणार निवडणूक? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक - टॉप न्यूज मराठी

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून 16 जागांवर निवडणूक आणि एका जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका न झाल्यानं ही निवडणूक रखडली होती मात्र आता या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

कसा असेल  निवडणूक कार्यक्रम? 

निवडणुकीची अधिसूचना 25 मे 

अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस 1 जून

अर्जाची छाननी 2 जून

अर्ज माघारीचा अखेरचा दिवस 4 जून 

निवडणूक 18 जून

मतमोजणी 22 जून

कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणूक 

  1. सोलापूर 
  2. अहमदनगर 
  3. ठाणे 
  4. पुणे
  5. जळगाव 
  6. सातारा, सांगली 
  7. नांदेड 
  8. यवतमाळ
  9. भंडारा, गोंदिया 
  10. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
  11. नाशिक 
  12. वर्धा,चंद्रपूर, गडचिरोली 
  13. अमरावती
  14. उस्मानाबाद, लातूर, बीड
  15. परभणी, हिंगोली
  16. औरंगाबाद, जालना
  17. नागपूर लोकल (पोटनिवडणूक)