सिंधुदुर्गच्या पर्यटनाला नवी भरारी, 16 नोव्हेंबरपासून चिपी विमानतळावरून नवी मुंबईसाठी नियमित विमानसेवा सुरू - टॉप न्यूज मराठी

सिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला आता नवी भरारी मिळणार आहे. येत्या 16 नोव्हेंबरपासून सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळावरून नवी मुंबईसाठी नियमित विमानसेवा सुरू होणार आहे. फ्लाय 91 कंपनीची विमानसेवा आठवड्याचे सातही दिवस सुरू राहणार असल्याची माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली आहे.

मुंबईशी थेट हवाई संपर्क निर्माण झाल्यामुळे सिंधुदुर्गातील पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. त्यामुळे स्थानिक व्यवसाय आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

चिपी विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडून विविध स्तरावर प्रयत्न करण्यात आले आहेत. आता नियमित विमानसेवेमुळे सिंधुदुर्गच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे.

वेंगुर्ला, देवगडसह जिल्ह्यातील पर्यटन प्रकल्पांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

16 नोव्हेंबरपासून सुरू होणारी ही विमानसेवा सिंधुदुर्गच्या पर्यटन आणि आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.