राजस्थान : या गावाचे नाव आहे कुलधारा ! हे गाव जैसलमेरपासून फक्त 18 किमी अंतरावर आहे. 13 व्या शतकात म्हणजे सुमारे 1291 मध्ये हे गाव वसलं होतं. इथे पालीवाल ब्राह्मण समाज राहत होता, जे शेती आणि पाणी व्यवस्थापनात हुशार होते. गावात 410 घरं होती आणि 1500 हून अधिक लोक आनंदाने राहत होते.
यामागे दोन कथा सांगितल्या जातात. लोककथेनुसार, जैसलमेरचा क्रूर मंत्री सलीम सिंग याची नजर गावच्या प्रमुखाच्या सुंदर मुलीवर पडली. त्याने तिच्याशी जबरदस्तीने लग्न करण्याचा हट्ट धरला. जर मुलगी दिली नाही तर गावावर मोठा कर लावू अशी धमकी दिली. आपली इज्जत वाचवण्यासाठी 85 गावातील पालीवाल ब्राह्मणांनी एका रात्रीत गाव सोडण्याचा निर्णय घेतला आणि ते कायमचे गायब झाले.
गाव सोडताना पालीवालांनी शाप दिला होता की या जमिनीवर पुन्हा कधीच कोणी वसू शकणार नाही. आजही हे गाव ओसाड आहे. इथे कोणी राहण्याचा प्रयत्न केला तर त्याला विचित्र अनुभव येतात, असे सांगितले जाते. राजस्थान सरकारने आता याला हेरिटेज टुरिस्ट प्लेस म्हणून विकसित केले आहे. स्थानिक लोक मात्र हे भूतांचे गाव नसून फक्त उजाड गाव आहे, असे सांगतात. तरीही या गावाचे रहस्य आजही कायम आहे.
खरंतर फक्त कुलधरा नाही, तर त्याच्या आजूबाजूची 83 गावं सुद्धा त्याच रात्री पालीवाल ब्राह्मणांनी सोडली होती. एकूण 84 गावं सर्व गावकऱ्यांनी सोडली. गावाच्या प्रवेशद्वारावर राजस्थान सरकारने लिहिले आहे की हे गाव भुताटकी नाही, तर ऐतिहासिक वारसा आहे. पण तरीही संध्याकाळी 6 नंतर इथे कुणालाही थांबू दिले जात नाही. दिल्लीची एक पॅरानॉर्मल टीम इथे रात्रभर थांबली होती. त्यांच्या मशीनमध्ये विचित्र सिग्नल आले आणि काहींना कुणी तरी खांद्याला स्पर्श केल्याचा भास झाला, असा त्यांचा दावा आहे. आता ASI (भारतीय पुरातत्व विभाग) ने हे गाव जतन केले आहे. दिवसातून 500-600 पर्यटक येतात. तिथे एक माताजीचे मंदिर आहे, जे आजही चांगल्या स्थितीत आहे. वाळवंटात थंडावा राहावा म्हणून घरांची भिंत जाड, छत कमी उंचीचे आणि रस्ते असे बनवले होते की थेट वारा घरात येणार नाही. पाणी साठवण्यासाठी त्यांनी 'खडीन' नावाची खास पद्धत वापरली होती.
या गावाबाबत इतिहासकारांचे मत वेगळे आहे. पाण्याची कमतरता, जास्त कर आणि राजकीय अस्थिरतेमुळे लोकांनी हळूहळू गाव सोडले असावे. एका रात्रीत गाव रिकामे झाल्याचा कोणताही पुरावा नाही.