जाणून घ्या ! 15 सप्टेंबरपर्यंत UPI Re-KYC बंधनकारक; QR कोड बंद होणार ? नेमकं सत्य काय ? - टॉप न्यूज मराठी

सोशल मीडियावर "15 सप्टेंबरपर्यंत UPI Re-KYC नाही केलं तर UPI बंद होईल" असा मेसेज व्हायरल होत आहे. पण यात अर्धसत्य आहे. हा नियम सामान्य UPI युजर्ससाठी नाही, तर दुकानदार आणि व्यापाऱ्यांसाठी आहे.

RBI ने सप्टेंबर 2025 मध्ये Payment Aggregator साठी नवे Master Directions काढले आहेत. त्यानुसार PhonePe, Google Pay, Paytm, BharatPe सारख्या कंपन्यांना त्यांच्याकडील सर्व जुन्या व्यापाऱ्यांचे (Merchants) पुन्हा KYC करणे बंधनकारक आहे. त्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2026 आहे.

कोणावर परिणाम होणार ?

जे छोटे दुकानदार, टपरीवाले, ऑनलाइन सेलर्स आपल्या दुकानात UPI QR कोड लावून पैसे घेतात, त्यांना Re-KYC करावे लागेल. जर 15 सप्टेंबरपर्यंत कागदपत्रे दिली नाहीत, तर त्यांचा QR कोड बंद होऊ शकतो आणि UPI ने पैसे घेता येणार नाहीत. रिपोर्टनुसार सुमारे 30-35% लहान दुकानदार आणि 10 लाख ऑनलाइन व्यावसायिक यांना कागदपत्रांअभावी अडचण येऊ शकते.

सामान्य ग्राहकांचं काय ?

तुम्ही फक्त UPI ने पैसे पाठवत असाल, तर तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. तुमचे UPI अॅप बंद होणार नाही. फक्त तुम्ही दुकानदार असाल आणि तुम्हाला कंपनीकडून KYC साठी कॉल किंवा मेसेज आला असेल, तर त्वरित पॅन, आधार आणि बँक डिटेल्स देऊन KYC पूर्ण करा.