दिवाळीला अजून 15 ते 18 दिवस बाकी आहेत आणि घर आवरायचे टेन्शन आलंय का, सण जवळ आला की सगळं घर एकाच दिवशी आवरायला घेतो आणि दमतो. त्यापेक्षा रोज थोडं थोडं केलं तर घर चकाचक होईल आणि थकवाही येणार नाही. हा आहे 15 दिवसांचा सोपा प्लॅन.
पहिले 3 दिवस - सामान कमी करा
रोज 1 खोली घ्या. कपाटातले जुने कपडे, फाटकी चादर, एक्सपायरी झालेली औषधे, तुटकी भांडी असे नको असलेले सामान एका पोत्यात भरा. हे सामान गरजू लोकांना देऊ शकता किंवा भंगारमध्ये टाकू शकता. घरात 30 टक्के सामान असंच नको असलेलं असतं.
दिवस 4 ते 6 - किचन क्लीनिंग
किचन हे सगळ्यात जास्त घाण होतं. एक दिवस गॅस, शेगडी आणि किचन ट्रॉली साफ करा. दुसऱ्या दिवशी डबे आणि बरण्या. बरण्यांना गरम पाणी आणि लिंबूने धुवा, झाकणांना उन्हात ठेवा. तिसऱ्या दिवशी फ्रीज. फ्रीज बंद करून बेकिंग सोडा आणि कोमट पाण्याने पुसून घ्या.
दिवस 7 ते 9 - बेडरूम आणि हॉल
पडदे आणि बेडशीट धुवायला काढा. कपाटाच्या वरची धूळ पुसा. पंखे साफ करा. पंख्याची धूळ खाली पडते म्हणून आधी पंखे साफ करा मग फरशी पुसा. टीव्ही, सोफा आणि शोकेसमधले सामान ओल्या कपड्याने पुसा.
दिवस 10 ते 12 - बाथरूम आणि टॉयलेट
बाथरूमच्या टाइल्सवर पांढरे डाग असतील तर व्हिनेगर आणि खायचा सोडा लावा, 15 मिनिटे ठेवून घासा. नळ आणि शॉवर लिंबू चोळा, चमक येईल. टॉयलेटसाठी हार्पिक वापरून रात्रभर ठेवा, सकाळी ब्रशने घासा.
दिवस 13 आणि 14 - खिडक्या आणि फरशी
सगळ्या खिडक्यांच्या काचा वर्तमानपत्राने पुसा, कागदाने जास्त चमक येते. दाराच्या कोपऱ्यातील जाळी काढा. शेवटी पूर्ण घराची फरशी फिनेलच्या पाण्याने पुसा.
दिवस 15 - सजावट
आता फक्त सजावट बाकी. तोरण, रांगोळी, लाइटिंग आणून ठेवा. घरात एका कोपऱ्यात धूप लावा, घर प्रसन्न वाटेल.
3 स्मार्ट टिप्स जी काम सोपं करतील
1. एकाच वेळी सगळं घर नका आवरू, रोज फक्त 1 तास द्या.
2. काम करताना एक बादली, एक घासणी आणि एक ओला कपडा जवळच ठेवा.
3. मुलांना पण छोटी छोटी कामे द्या, त्यांनाही सवय लागेल.
या प्लॅनने तुम्हाला जास्त पैसेही लागणार नाहीत आणि घर दिवाळी आधी नवीनसारखे दिसेल.