हॉटेलसारखी झणझणीत सोयाबीन चिल्ली ! लहान मुलं पण आवडीने खातील, 15 मिनिटात तयार ! - टॉप न्यूज मराठी

घरात सोयाबीन पडून आहेत आणि भाजीचा कंटाळा आलाय ? मग एकदा ही सोयाबीन चिल्ली ट्राय करा. चवीला एकदम रेस्टॉरंट स्टाईल लागते आणि प्रोटीनने भरपूर आहे.

साहित्य :

1 वाटी सोयाबीन वडी, 1 सिमला मिरची चौकोनी चिरलेली, 1 मोठा कांदा चौकोनी, 4-5 लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या, 1 इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या, 2 चमचे सोया सॉस, 1 चमचा टोमॅटो सॉस, 1 चमचा चिल्ली सॉस, 1 चमचा कॉर्नफ्लोअर, तेल, मीठ.

कृती - 

स्टेप 1: सोयाबीन तयार करा

गरम पाण्यात मीठ टाकून सोयाबीन 10 मिनिटे भिजत ठेवा. नंतर पिळून पाणी काढा. आता त्यात थोडे मीठ, 1 चमचा कॉर्नफ्लोअर आणि चिमूटभर लाल तिखट लावून मिक्स करा.

स्टेप 2: तळून घ्या

कढईत तेल गरम करा आणि सोयाबीन हलकं सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. जास्त काळं करू नका, नाहीतर कडक होतील. बाहेर काढून ठेवा.

स्टेप 3: चिल्ली तडका

त्याच कढईत 2 चमचे तेल ठेवा. त्यात लसूण, आलं, हिरवी मिरची टाका. नंतर कांदा आणि सिमला मिरची टाका. भाज्या जास्त शिजवू नका, थोड्या कुरकुरीतच ठेवा, तरच मजा येईल.

स्टेप 4: सॉस मिक्स करा

आता त्यात सोया सॉस, टोमॅटो सॉस, चिल्ली सॉस टाका. अर्धी वाटी पाण्यात 1 चमचा कॉर्नफ्लोअर मिसळून ते पाणी यात टाका. ग्रेव्ही घट्ट होऊ लागेल.

शेवटी तळलेले सोयाबीन टाका, वरून कोथिंबीर आणि कांद्याची पात टाका. गरमागरम सर्व्ह करा. ही डिश फ्राईड राईस किंवा चपाती सोबत अप्रतिम लागते. एकदा बनवाल तर नेहमी बनवाल!