पावसाळ्यात घाईगडबडीत स्वयंपाक करायचा असेल आणि काही सुचत नसेल तर ही बटाटा-टोमॅटोची रस्सा भाजी बेस्ट ऑप्शन आहे. साहित्य घरात नेहमीच असतं आणि फक्त 15 मिनिटात भाजी तयार होते. पोळी, भाकरी किंवा भातासोबत अप्रतिम लागते.
1. बटाटे - 2 मध्यम आकाराचे
2. टोमॅटो - 3 मोठे
3. कांदा - 1 बारीक चिरलेला
4. हिरवी मिरची - 1 ते 2
5.आलं-लसूण पेस्ट - 1 चमचा
6. तेल - 2 चमचे
7. जिरे - 1/2 चमचा
8. हळद - 1/4 चमचा
9. लाल तिखट - 1 चमचा
10. गरम मसाला - 1/2 चमचा
11. मीठ - चवीनुसार
12. कोथिंबीर - थोडीशी
तयारी करा
बटाटे उकडून साल काढा आणि चौकोनी तुकडे करा. 3 टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्या. हिरवी मिरची उभी चिरा.
फोडणी द्या
कढईत 2 चमचे तेल गरम करा. त्यात जिरे टाका. जिरे तडतडल्यावर बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घाला. कांदा गुलाबी होईपर्यंत परता. आता 1 चमचा आलं-लसूण पेस्ट घालून 30 सेकंद परता.
मसाला आणि रस्सा
आता टोमॅटोची पेस्ट घाला. त्यात हळद, तिखट आणि मीठ टाका. तेल सुटेपर्यंत 3-4 मिनिटे चांगले शिजवा. नंतर त्यात 1 ग्लास पाणी घाला आणि उकळी येऊ द्या.
बटाटा घालून शिजवा
उकळी आली की त्यात उकडलेले बटाट्याचे तुकडे घाला. वरून 1/2 चमचा गरम मसाला टाका. झाकण ठेवून 5 मिनिटे मंद आचेवर शिजू द्या. शेवटी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाका. बस ! गरमागरम बटाटा-टोमॅटो रस्सा भाजी तयार आहे.
1. रस्सा जास्त हवा असेल तर पाणी अजून थोडे वाढवा.
2. चव वाढवण्यासाठी शेवटी अर्धा चमचा साखर आणि लिंबाचा रस टाकू शकता.
3. वेळ वाचवण्यासाठी बटाटे आधीच कुकरमध्ये उकडून ठेवा.