महत्त्वाची माहिती : आधार कार्डवर फक्त 14 वेळाच नाव बदलता येते, नवा नियम काय ? सत्य नेमके काय ? - टॉप न्यूज मराठी

सोशल मीडियावर सध्या एक मेसेज व्हायरल होत आहे की आधार कार्डवर 14 वेळा नाव बदलता येते. पण ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे. UIDAI ने याबाबत स्पष्ट नियम सांगितले आहेत. जर तुम्ही वारंवार नाव बदलण्याचा विचार करत असाल तर तुमचे आधार ब्लॉक देखील होऊ शकते.

UIDAI च्या नव्या नियमानुसार आधार कार्डवर नाव आयुष्यात फक्त दोन वेळाच बदलता येते. म्हणजे तुम्ही दोन वेळा नावात दुरुस्ती करू शकता. पहिल्यांदा स्पेलिंग मिस्टेक असेल तर आणि दुसऱ्यांदा लग्नानंतर आडनाव बदलायचे असेल तर. तिसऱ्यांदा नाव बदलायचे असेल तर सामान्य पद्धतीने होणार नाही.

यासाठी तुम्हाला थेट UIDAI च्या रिजनल ऑफिसमध्ये जावे लागेल. तिथे तुम्हाला गॅझेट नोटिफिकेशन, कोर्टाचा आदेश किंवा पासपोर्ट सारखा ठोस पुरावा द्यावा लागेल. रिजनल ऑफिसर तुमची केस तपासूनच पुढचा निर्णय घेतो. त्यामुळे 14 वेळा नाव बदलता येते हा दावा साफ खोटा आहे.

आधारच्या इतर बदलांचे नियम देखील समजून घ्या. जन्मतारीख आयुष्यात फक्त एकदाच बदलता येते. त्यातही तीन वर्षांपेक्षा जास्त फरक असेल तर बदल होत नाही. लिंग देखील फक्त एकदाच बदलता येते. पत्ता आणि मोबाईल नंबर कितीही वेळा बदलता येतो, त्यावर कोणतीही मर्यादा नाही.

नाव बदलण्यासाठी तुम्हाला http://myaadhaar.uidai.gov.in या वेबसाईटवर जावे लागेल किंवा जवळच्या आधार सेवा केंद्रात जावे लागेल. 50 रुपये फी भरून तुम्ही नाव बदलू शकता. कागदपत्र म्हणून पॅन कार्ड, पासपोर्ट किंवा मॅरेज सर्टिफिकेट लागते.

14 वेळा हा आकडा कुठून आला तर UIDAI ने एकदा सांगितले होते की 14 वर्षांखालील मुलांचे बायोमेट्रिक अपडेट करावे लागते, त्याचा चुकीचा अर्थ लावून हा मेसेज पसरला. त्यामुळे कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका. नाव बदलताना काळजीपूर्वक स्पेलिंग टाका, कारण दोन संधी संपल्या तर खूप मनस्ताप सहन करावा लागेल.