रंजक रोचक : हिमालयात सापडले असे गाव जिथे लोक 120 वर्ष जगतात, डॉक्टरांनी सांगितले पाण्यात आहे जादू - टॉप न्यूज मराठी

नवी दिल्ली - हिमालयाच्या कुशीत असे एक गाव आहे जिथे लोकांचे सरासरी वय 120 ते 150 वर्ष मानले जाते. या गावाचे नाव आहे हुंझा व्हॅली. हे गाव भारत-पाकिस्तान सीमेजवळ गिलगिट बाल्टिस्तान परिसरात वसलेले आहे. येथील लोकांच्या दीर्घायुष्याचे रहस्य आजही डॉक्टर आणि शास्त्रज्ञांसाठी एक मोठे कोड आहे.

काय आहे या गावाचे रहस्य?

हुंझा जमातीच्या लोकांवर अनेक शास्त्रज्ञांनी संशोधन केले आहे. ब्रिटिश डॉक्टर रॉबर्ट मॅकॅरिसन यांनी या जमाती सोबत अनेक वर्ष राहून अभ्यास केला. त्यांच्या मते त्यांना या गावात एकही व्यक्ती कॅन्सर, अल्सर किंवा पोटाच्या आजाराने ग्रस्त आढळली नाही. 1963 साली एका फ्रेंच मेडिकल टीमने या गावाची जनगणना केली होती. त्यात येथील लोकांचे सरासरी आयुष्य 120 वर्ष असल्याचे समोर आले होते. तर 1977 साली पॅरिसमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय कॅन्सर परिषदेत असे सांगण्यात आले होते की भू-कर्करोगाच्या अभ्यासानुसार कॅन्सरचा एकही रुग्ण नसलेला समाज फक्त हुंझा हाच आहे.

पाण्यात आहे जादू

येथील दीर्घायुष्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे येथील पाणी असल्याचे डॉक्टर हेन्री कोंडा यांनी सांगितले आहे. त्यांनी हुंझाच्या लोकांच्या पिण्याच्या पाण्यावर संशोधन केले आणि त्यावर एक पुस्तक देखील लिहिले. हुंझा लोक हिमनदी वितळून आलेले पाणी पितात. हे पाणी नैसर्गिकरित्या खनिजांनी समृद्ध असते. या पाण्यात पोटॅशियम, कॅल्शियम, लोह आणि मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात आढळते. हे पाणी शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करते आणि हृदय निरोगी ठेवते. त्यामुळे येथील लोकांचे वय वाढत नाही असे मानले जाते.

आहार आणि जीवनशैली

हुंझा लोकांचा आहार पूर्णपणे शाकाहारी आहे. ते कच्च्या भाज्या, फळे आणि विशेषतः जर्दाळू म्हणजेच बदाम सारखे फळ जास्त खातात. ते नैसर्गिक आणि रसायनमुक्त अन्न खातात. आठवड्यातून ते नियमित उपवास देखील करतात. दारू आणि गोड पदार्थांचे सेवन ते खूप कमी करतात. येथील लोक दररोज शारीरिक काम करतात. डोंगरावर चालणे, शेती करणे हा त्यांच्या जीवनाचा भाग आहे. त्यामुळे ते 100 वर्षांचे झाल्यावरही शेतात काम करताना दिसतात. त्यांची दिनचर्या कधीही बदलत नाही.

हाँगकाँग येथे 1984 साली एक आश्चर्यकारक घटना घडली होती. सईद अब्दुल मोबूत नावाचा एक हुंझा व्यक्ती लंडनच्या हिथ्रो विमानतळावर आला तेव्हा त्याच्या पासपोर्टवर जन्म 1823 असल्याचे लिहिले होते. म्हणजे त्याचे वय 160 वर्ष होते. तरीही त्याची प्रकृती चांगली होती आणि त्याची स्मरणशक्ती देखील चांगली होती. त्यामुळे डॉक्टरांचे असे म्हणणे आहे की शुद्ध पाणी, साधा आहार आणि सतत शारीरिक श्रम हेच 150 वर्ष जगण्याचे खरे रहस्य आहे.

माहिती स्रोत : इंटरनेट