पुणे : अन्न आणि औषध प्रशासनाने महाराष्ट्रात स्वच्छता आणि अन्नसुरक्षेसाठी धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत पुणे जिल्ह्यातील 12 हॉटेल्स आणि आस्थापनांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. भजीत प्लास्टिकचा धागा, ताकात माशी सापडल्यापासून ते इतर गंभीर स्वच्छतेच्या त्रुटींमुळे या 12 ठिकाणांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.
पुणे जिल्हा
1. जोकर हॉस्पिटलिटी, वाळेवाडी, पुणे
2. रेड अँड ह्युज, कल्याणीनगर, पुणे
3. टोनी दा ढाबा, नायगाव, कामशेत, मावळ
4. हॉटेल लोकप्रिय, मार्केट यार्ड, पुणे
5. फाउंटन प्युअर व्हेज, आळेफाटा
6. के.एम. फुड्स, खेड
7. अक्सा बेकरी, आदर्श नगर, PCMC
8. जय सद्गुरु इराणी चहा अँड स्नॅक्स सेंटर, मार्केट यार्ड
9. टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड, सिस्टर अँड प्रायव्हेट लिमिटेड, बावधन
सातारा जिल्हा
10. शालिमार उडपी व्हेज रेस्टॉरंट
11. सुरभी हॉटेल अँड बार, वडूज, तालुका खटाव
मुंबई
12. बृहन्मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृहाचा परवानाही निलंबित करण्यात आला आहे.
FDA च्या तपासणीत अनेक ठिकाणी अन्नपदार्थात भेसळ आणि अस्वच्छता आढळून आली. ग्राहकांच्या तक्रारींनंतर केलेल्या तपासणीत काही हॉटेल्सच्या भजीत प्लास्टिकचा धागा आणि ताकात माशी आढळली. याशिवाय परवान्याशिवाय व्यवसाय, वापरलेल्या तेलाचा पुनर्वापर आणि इतर नियमभंग झाल्याचे आढळले.
अन्नसुरक्षा कायद्यानुसार हॉटेल्ससाठी नेमके नियम काय?
FDA ने सर्व खाद्य विक्रेत्यांना खालील नियम पाळण्याचे निर्देश दिले आहेत:
1. शुद्ध पाणी: ग्राहकांना मोफत शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे बंधनकारक
2. पॅकिंग: फूड ग्रेड दर्जाचे पॅकिंग साहित्यच वापरणे आवश्यक
3. परवाना: विनापरवाना कोणताही खाद्य व्यवसाय करता येणार नाही
4. तेल: वापरलेल्या खाद्यतेलाचा पुनर्वापर करण्यास बंदी
5. मेनू: मेनू कार्डवर दिशाभूल करणारी माहिती देऊ नये
तक्रार कुठे करावी?
ग्राहकांना अन्नपदार्थाचा दर्जा किंवा स्वच्छता याविषयी तक्रार करायची असल्यास FDA च्या टोल फ्री क्रमांक 1800 22 23 65 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
FDA ने नागरिकांना बाहेर जेवताना स्वच्छता, परवाना आणि अन्नाची गुणवत्ता तपासूनच खरेदी करण्याचे आवाहन केले आहे.