मोठी बातमी : उद्धव ठाकरेंच्या सेनेला पुन्हा मोठा सुरुंग; 12 नगरसेवक सोडणार साथ ? - टॉप न्यूज मराठी

नाशिक : महाराष्ट्राचे राजकारण सध्या प्रचंड तापलेल आहे. एकनाथ शिंदेंनी Eknath Shinde ऑपरेशन टायगर अंतर्गत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सुरुंग लावला आहे. यामध्ये सहा खासदार आणि एक आमदार आतापर्यंत फुटले आहेत. तर आता नाशिकमधून तब्बल 12 नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेमध्ये शामिल होणार अशी मोठी बातमी आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक Nashik महानगरपालिकेमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. उद्धव ठाकरेंच्या सेनेतील दहा ते बारा नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या सेनेतील वरिष्ठ नेत्यांना भेटले आहेत. दरम्यान हे नगरसेवक आता एकनाथ शिंदे सोबत सामील होण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती असून या नगरसेवकांना पाच कोटी रुपयांच्या विशेष निधी देणार असल्याचे समजते आहे.

एकीकडे उद्धव ठाकरे पक्ष पुनर्बांधणीसाठी प्रयत्न करत असतानाच दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी लावलेला सुरुंग खासदार आणि आमदारानंतर नगरसेवकांना देखील फोडण्याचे काम करतो आहे. लवकरच या नगरसेवकांच्या निर्णयाबद्दल स्पष्टीकरण मिळेल.