रंजक रोचक : दिवसाला 10,000 पावले चालण्याचा नियम आता जुना झाला आहे का ? हा सल्ला डॉक्टरांचा नाही; सत्य वाचून हसाल ! - टॉप न्यूज मराठी

रंजक रोचक : दहा हजार पावले चालले पाहिजे हा नियम आपण अनेक वर्षांपासून ऐकत आहोत. प्रत्येकाच्या स्मार्टवॉच मध्ये दहा हजार पावलांचे टार्गेट असते. पण हा आकडा कुठून आला हे तुम्हाला माहिती आहे का. हा आकडा डॉक्टरांनी दिलेला नाही. 1965 साली जपान मध्ये एका कंपनीने पेडोमीटर विकण्यासाठी जाहिरात केली होती. त्याचे नाव होते मॅनपो-केई, जपानी भाषेत याचा अर्थ होतो दहा हजार पावले. तिथून हा आकडा मार्केटिंग मधून पूर्ण जगात पसरला आणि लोकांना वाटले की हा आरोग्याचा नियम आहे.

2024 आणि 2025 मध्ये यावर अमेरिकेत आणि युरोप मध्ये मोठे रिसर्च झाले आहेत. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या रिपोर्ट नुसार हृदय निरोगी ठेवण्यासाठी दिवसाला सात हजार ते आठ हजार पावले पुरेशी आहेत. फक्त सात हजार पावले जरी रोज चाललात तरी हृदयविकाराचा धोका चाळीस टक्के पर्यंत कमी होतो. दहा हजार पेक्षा जास्त चालल्याने फायदा होतो पण तो फार मोठा नसतो. त्यामुळे दहा हजार पूर्ण नाही झाले म्हणून स्वतःला दोष देण्याची गरज नाही. महत्वाचे किती चालता यापेक्षा कसे चालता हे आहे. बाजारात हळू हळू फिरणे आणि वेगात चालणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे.

रोज सकाळी किंवा संध्याकाळी सलग तीस मिनिटे वेगात चालणे, ज्यात तुम्हाला थोडा घाम येईल आणि श्वास थोडा वेगात होईल, हे जास्त फायदेशीर आहे. एकाच वेळी दहा हजार पावले करण्यापेक्षा दिवसभरात थोडे थोडे करून सात हजार पावले पूर्ण करणे शरीरासाठी चांगले असते. जसे की लिफ्ट ऐवजी जिना वापरणे, जेवणानंतर दहा मिनिटे शतपावली करणे, फोनवर बोलताना उभे राहून बोलणे. जर तुम्ही दिवसभर बसून काम करत असाल तर दर एका तासाने पाच मिनिटे उठून चालणे गरजेचे आहे. यामुळे कंबर दुखी आणि वजन वाढणे कमी होते. सुरुवात पाच हजार पासून करा आणि हळू हळू वाढवा. 

डिस्क्लेमर : हा लेख सामान्य माहितीसाठी आहे, तुम्हाला काही आजार असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.