दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या विमानात भारतीय पायलटने दाखवले शौर्य, चाकू लागून जखमी असतानाही 100 हून अधिक प्रवाशांचे प्राण वाचवले, पंतप्रधान मोदींकडून कौतुक - टॉप न्यूज मराठी

दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या विमानात घडलेल्या एका थरारक घटनेत भारतीय पायलटने दाखवलेल्या धाडसाचे जगभरातून कौतुक होत आहे. कॅप्टन स्मित मच्छार यांनी गंभीर जखमी अवस्थेतही विमानातील 100 हून अधिक प्रवाशांचे प्राण वाचवले.

मिळालेल्या माहितीनुसार या फ्लाईटच्या को पायलटने मुद्दाम विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कॅप्टन स्मित मच्छार यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत स्मित यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला आणि ते गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेतही त्यांनी विमानावरील नियंत्रण मिळवले आणि मोठा अनर्थ टळला.

या घटनेनंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी कॅप्टन स्मित यांचे कौतुक केले आहे. एका भारतीयाने दुसरा 9/11 होण्यापासून वाचवले, तो खरा नायक आहे, अशा शब्दात नेतान्याहू यांनी गौरव केला. फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत बोलताना नेतान्याहू यांनी दावा केला की या हल्ल्याची गुप्त माहिती आम्ही आधीच ब्रिटनला दिली होती आणि या हल्ल्यामागे इराणचा हात असल्याचेही सांगितले होते.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. कॅप्टन स्मित यांनी 9/11 सारखी घटना होण्यापासून वाचवले, त्यांच्या या शौर्याने देशाचा गौरव वाढला आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री के. राममोहन नायडू यांनीही स्मित यांच्या शौर्याचे कौतुक केले. जेव्हा त्यांच्यावर हल्ला झाला तो अतिशय कठीण काळ होता. जीव धोक्यात असतानाही त्यांनी 100 हून अधिक लोकांचे प्राण वाचवले. हीच भारताची ओळख आहे, असे नायडू यांनी म्हटले.

दरम्यान, कॅप्टन स्मित यांच्या मित्रांनी आणि शेजाऱ्यांनीही त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. आम्हाला आमच्या भारतीय मित्राचा आणि शेजाऱ्याचा अभिमान आहे. त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. कुटुंबीय त्यांच्या प्रकृतीच्या ताज्या अपडेटची वाट पाहत आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांच्या मित्रांनी दिली. कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती समोर येत आहे.