शैक्षणिक : 10 वी नंतर काय करायचे हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांसमोर असतो. सगळ्यांनाच 11 वी, 12 वी करून पुढे जायचे नसते. अनेकांना लवकर शिकून लवकर नोकरी करायची असते. अशा विद्यार्थ्यांसाठी ITI हा सर्वात चांगला पर्याय मानला जातो.
ITI म्हणजे इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. यात 2 वर्षांचा कोर्स असतो. 10 वी नंतर तुम्ही इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, टर्नर, मोटर मेकॅनिक, प्लंबर, कॉम्प्युटर ऑपरेटर अशा ट्रेडमध्ये प्रवेश घेऊ शकता. यात फक्त पुस्तकी शिक्षण नसते तर प्रत्यक्ष काम शिकवले जाते. त्यामुळे ITI झालेला विद्यार्थी कामासाठी लगेच तयार असतो.
सध्या कोणत्या ट्रेडला जास्त मागणी आहे हे माहित असणे गरजेचे आहे. इलेक्ट्रिशियन आणि फिटर या ट्रेडला कंपनीमध्ये कायम मागणी असते. त्याचबरोबर सध्या इलेक्ट्रिक वाहनांमुळे मोटर मेकॅनिक आणि वायरमनला पण चांगली मागणी वाढली आहे. कॉम्प्युटरशी संबंधित कोर्स केले तर ऑफिसमध्येही नोकरी मिळते.
पगाराबद्दल बोलायचे झाले तर सुरुवातीला 12 हजार ते 18 हजार रुपये पगार मिळतो. अनुभव वाढला की 25 ते 30 हजारांपर्यंत पगार जातो. सरकारी नोकरीसाठी रेल्वे, आर्मी, एमएसईबीमध्ये ITI वाल्यांना मोठी संधी असते.
स्वतःचा व्यवसाय करायचा असेल तरी ITI फायदेशीर आहे. इलेक्ट्रिशियन किंवा प्लंबरचे स्वतःचे दुकान टाकून महिना 30 ते 40 हजार रुपये सहज कमावता येतात. सरकारकडूनही व्यवसायासाठी कर्ज मिळते.
त्यामुळे 10 वी नंतर फक्त मार्कांचा विचार न करता मुलाच्या आवडीचा विचार करून ITI निवडली तर भविष्य नक्कीच उज्ज्वल होईल.
माहिती स्त्रोत इंटरनेट