आरोग्य : ताक म्हणजे अमृत, रोज ताक प्यायल्याने मिळतात हे 10 मोठे फायदे, कोल्ड्रिंकला करा रामराम - टॉप न्यूज मराठी

शास्त्रात ताज्या ताकाची तुलना अमृताशी केलेली आहे. ताक हे शरीरातील घातक पदार्थ मूत्रावाटे बाहेर काढून शरीरात रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. ताकात व्हिटामिन बी-12, कॅल्शियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस सारखी तत्व असतात, जी शरीरासाठी अत्यंत फायद्याची असतात.

ज्याचे पोट साफ होत नाही आणि पोटातून आवाज येतात, त्यांनी ताक प्यायल्याने असे त्रास कमी होतात. ताक प्यायल्यानंतर शरीराची झीज भरून निघते, शरीरातील उष्णता त्वरित कमी होते आणि अतिशय शांत झोप लागते. साधारण माणसाने सुद्धा दररोज ताक प्यायल्याने शरीरातील उष्णता कमी होते आणि ताकद वाढते.

ताक पिण्याचे 10 प्रकारचे फायदे जाणून घेऊया.

1. ताक प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो.

2. वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर ताकात मीठ टाकून प्यावे. त्रास कमी होतो.

3. दह्याचे पाणी अथवा ताकाने गुळण्या केल्यास तोंड येणे बरे होते.

4. ताकात ओवा टाकून प्यायल्यास पोटातील जंतू मरून जातात.

5. ताकात गूळ टाकून प्यायल्यास लघवी करताना होणारी जळजळ बंद होते.

6. थोडी जायफळ पूड ताकात टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते.

7. रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने पोटदुखी बरी होते.

8. ताकात साखर आणि काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो.

9. लहान मुलांना दात येताना दररोज 4 चमचे असे दिवसभरातून 2-3 वेळा ताक दिल्यास दात येताना होणारा त्रास कमी होतो.

10. तीन दिवस इतर काहीही न खाता फक्त ताक पीत राहिल्यास शरीराचे पंचकर्म आपोआप होते, असे सांगितले जाते.

त्यामुळे तब्येत ठीक राहतेच, पण पैसाही वाचतो. सहा महिन्यातून एक वेळ असा प्रयोग केल्यास होणारे भावी मोठे आजार टळतील, असा दावा केला जातो. त्यामुळे होणारा त्रास आणि औषधी खर्चही वाचेल.