गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबवायच्या, अखेर तिघींना अटक, सराईत महिला चोरट्यांकडून 10 तोळे सोने हस्तगत - टॉप न्यूज मराठी

पुणे : पुण्यातील बाजारपेठेतील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी आणि मंगळसूत्र चोरणाऱ्या टोळीला लष्कर पोलिसांनी जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी 3 सराईत महिला चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून 10 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोने हस्तगत केले आहे.

लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नंबर 403/2025 भा.न्या.सं. कलम 303(2)(4) व गु.र.नं. 401/2025 भा.न्या.सं. कलम 309(4), 309(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी बाजारात खरेदीसाठी गेल्या असताना गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरीला गेली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला.

तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. त्यामध्ये 1) निशा संतोष विसोरिया वय 30 वर्षे, रा. आंबेडकरी वस्ती, ता. खेड, जि. पुणे, मूळ पता कविवाडी गाव, ता. बीना, तहसील पांढुर्णा, जि. पांढुर्णा, भोपाळ, मध्यप्रदेश 2) रिशा वसीम आणि अस्मिक विसोरिया वय 32 वर्षे, रा. अशोका गार्डन, थानो कोलोनी, तहसील बैरागढ, जि. भोपाळ, मध्यप्रदेश 3) पुनम प्रदीप विसोरिया वय 20 वर्षे, रा. माता मंदिरा गाव, थाना कोलोनी, तहसील बैरागढ, जि. भोपाळ, मध्यप्रदेश या तिघींना अटक करण्यात आली आहे.

त्यांच्याकडून 23 ग्रॅम, 80 ग्रॅमचे गंठण, 70 ग्रॅमचे मंगळसूत्र, सोनसाखळी असा एकूण 12 तोळे सोने जप्त करण्यात आले आहे. त्यांची किंमत सुमारे 10 लाख 60 हजार रुपये आहे. या तिघींवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. पुढील तपास लष्कर पोलीस करत आहेत.