गणेशोत्सवात दुर्वा मिळत नाहीत ? घरच्या घरी कुंडीत 10 दिवसात दुर्वा उगवण्याची सोपी पद्धत - टॉप न्यूज मराठी

गणेशोत्सव आला की प्रत्येक घरात दुर्वांना खूप मागणी असते. बाजारात एका जुडीसाठी 20 ते 30 रुपये मोजावे लागतात आणि तीही ताजी मिळत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का, दुर्वा हे अतिशय वेगाने वाढणारे गवत आहे आणि ते तुम्ही घरच्या घरी अगदी सहज उगवू शकता.

घरी दुर्वा कशा उगवायच्या?

1. दुर्वांच्या मुळ्या किंवा बिया मिळवा:

तुम्हाला नर्सरीमध्ये दुर्वाचे बियाणे मिळेल. जर बियाणे मिळाले नाही तर बाजारातून आणलेल्या दुर्वांच्या जुडीतून थोडी मुळे असलेली दुर्वा बाजूला काढा. तीच तुमचे बियाणे म्हणून काम करेल.

2. कुंडी आणि माती तयार करा:

दुर्वाला जास्त खोल माती लागत नाही. एक रुंद आणि उथळ कुंडी घ्या. त्यात 50 टक्के साधी बागेतील माती आणि 50 टक्के शेणखत किंवा गांडूळ खत मिक्स करा. माती भुसभुशीत असावी.

3. लागवड कशी करावी:

माती ओली करा. त्यावर दुर्वांच्या मुळ्या असलेले तुकडे टाका आणि वरून हलकी माती टाका. बिया असतील तर त्या थेट पसरवा. लक्षात ठेवा दुर्वाला दाबून लावायचे नाही.

4. पाणी आणि ऊन:

दुर्वाला रोज थोडे पाणी लागते. सकाळी आणि संध्याकाळी फवाऱ्याने पाणी द्या. पहिले 3-4 दिवस कुंडी सावलीत ठेवा, नंतर रोज 2-3 तास ऊन मिळेल अशा ठिकाणी ठेवा. दुर्वाला जास्त ऊन नाही तर मध्यम ऊन आवडते.

5. 10 दिवसात तय्यार:

तुम्ही लावलेल्या दुर्वा 7 ते 10 दिवसात कुंडीभर पसरतील. एकदा वाढली की ती खूप वेगाने पसरते. रोज थोड्या कापल्या तरी पुन्हा दुसऱ्या दिवशी नव्याने येतात.

गणेशोत्सवाच्या 15 दिवस आधीच कुंडी तयार करून ठेवा म्हणजे उत्सवापर्यंत तुम्हाला ताज्या दुर्वा मिळतील. दुर्वा कधीही उपटू नका, कात्रीने कापा म्हणजे मुळापासून पुन्हा येतात. रासायनिक खत अजिबात वापरू नका, कारण ती देवाला वाहायची आहे. या पद्धतीने तुम्हाला बाजारात जाण्याची गरज पडणार नाही आणि बाप्पासाठी रोज ताज्या, हिरव्यागार 21 दुर्वा घरच्याच कुंडीतून मिळतील.