अर्थकारण : क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका, 1 डिसेंबरपासून हे 5 नियम बदलणार - टॉप न्यूज मराठी

अर्थकारण : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने क्रेडिट कार्ड संदर्भात मोठे नवीन नियम जारी केले आहेत. RBI ने 28 नोव्हेंबर 2025 रोजी Commercial Banks, Small Finance Banks आणि NBFC साठी Credit Cards Issuance and Conduct Directions 2025 जारी केले आहेत. हे नियम तात्काळ लागू झाले असून 1 डिसेंबरपासून बँकांनी याची काटेकोर अंमलबजावणी सुरु केली आहे. जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर हे 5 नियम नक्की जाणून घ्या.

1. कार्ड अॅक्टिव्हेट केल्याशिवाय सिबिलवर रिपोर्ट होणार नाही.

आता बँक तुम्हाला कार्ड पाठवते पण तुम्ही अॅक्टिव्हेट करत नाही, तोपर्यंत बँक तुमची माहिती CIBIL, Experian सारख्या क्रेडिट ब्युरोला पाठवू शकणार नाही. जर आधीच पाठवली असेल तर ती त्वरित काढून टाकावी लागेल. यामुळे तुम्ही कार्ड न वापरल्यास तुमचा स्कोअर खराब होणार नाही.

2. तीन दिवसांचा ग्रेस पिरियड मिळणार.

आता EMI किंवा बिलाची तारीख निघून गेल्यावर लगेच लेट फी लागणार नाही. RBI च्या नव्या नियमानुसार खाते 3 दिवसांपेक्षा जास्त past due राहिल्याशिवाय बँक लेट फी लावू शकत नाही किंवा तुमचे नाव डिफॉल्टर म्हणून रिपोर्ट करू शकत नाही. तसेच लेट फी आता थकबाकीच्या रकमेवर आधारित असेल, 500 रुपयांच्या बिलावर 500 रुपयांची फी लावता येणार नाही.

3. सर्व फी आधीच सांगावी लागणार.

कोणत्याही बँकेला आता हिडन चार्जेस लावता येणार नाही. Key Fact Statement आणि Most Important Terms and Conditions मध्ये जॉईनिंग फी, वार्षिक फी, लेट पेमेंट फी, कॅश विथड्रॉवल चार्ज, फॉरेक्स मार्कअप आणि सर्व व्याजदर स्पष्ट लिहावे लागतील. कोणताही नवीन चार्ज वाढवायचा असेल तर एक महिना आधी ग्राहकाला कळवावे लागेल आणि तुमची लेखी परवानगी लागेल.

4. व्याजावर व्याज लागणार नाही.

आता बँका थकीत रकमेवर चक्रवाढ पद्धतीने व्याज लावू शकणार नाहीत. फक्त न भरलेल्या रकमेवरच व्याज आणि दंड लागेल. तुम्ही बिलाचा काही भाग भरला असेल तर भरलेल्या रकमेवर पुन्हा व्याज लागणार नाही. तसेच मिनिमम अमाऊंट भरल्यावर किती व्याज लागेल हे स्टेटमेंटमध्ये स्पष्ट लिहावे लागेल.

5. अनसोलिसिटेड कार्डवर बंदी.

तुमच्या परवानगीशिवाय बँकेला क्रेडिट कार्ड पाठवता येणार नाही किंवा तुमचे लिमिट वाढवता येणार नाही. जर बँकेने परवानगीशिवाय कार्ड दिले तर त्याचा गैरवापर झाल्यास जबाबदारी बँकेची असेल आणि बँकेला दंड भरावा लागेल. तसेच 30 दिवसात अॅक्टिव्हेट न झालेले कार्ड बँकेला OTP घेऊनच अॅक्टिव्हेट करावे लागेल, नाहीतर ते फ्री मध्ये बंद करावे लागेल.

या नियमांमुळे क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, पण त्याच वेळी बँका आता कार्ड देताना जास्त कडक तपासणी करत आहेत.