अर्थकारण : दर महिन्याच्या पहिल्या तारखेला बँकांचे नियम बदलतात पण या वेळी 1 ऑक्टोबर 2026 पासून RBI ने 2 मोठे बदल केले आहेत जे सामान्य माणसापासून मोठ्या व्यापाऱ्यांपर्यंत सगळ्यांवर परिणाम करणार आहेत.
1. बल्क FD म्हणजे 3 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या FD चे नियम बदलले
आता कोणत्याही बँकेला सकाळी 10 वाजता त्यांच्या वेबसाइटवर बल्क FD चा व्याजदर दाखवावा लागणार आहे. जास्तीत जास्त 10.10 पर्यंत अपडेट करावाच लागेल. वेबसाइटवर जो दर दाखवला असेल तोच दर ग्राहकाला द्यावा लागेल.
2. एकाच दिवशी एकाच रकमेच्या FD ला सगळ्या शाखेत एकच दर
पुण्यात SBI च्या कॅम्प शाखेत वेगळा दर आणि कोथरूड शाखेत वेगळा दर असे करता येणार नाही. एकाच दिवशी एकाच रकमेच्या ठेवीवर सगळ्या शाखेत समान व्याज द्यावे लागेल.
3. LCR नुसार बँकांना दर ठरवण्याची मुभा
Liquidity Coverage Ratio म्हणजे बँकेकडे अडचणीच्या वेळी किती पैसा राहील यावरून बँका बल्क FD वर वेगळा दर देऊ शकतात. हा नियम फक्त मोठ्या ठेवीदारांसाठी आहे. सामान्य 10 लाखापर्यंतच्या FD वाल्यांना याचा फटका नाही.
4. निर्यातदारांसाठी मोठा बदल - पैसे परत आणण्याची मुदत कमी
RBI ने FEMA नियमात बदल केला आहे. आधी निर्यात केल्यानंतर पैसे भारतात परत आणायला 15 महिने वेळ होता, आता 1 ऑक्टोबर पासून फक्त 9 महिने वेळ मिळेल. जर रुपयात व्यवहार असेल तर आधी 18 महिने होते आता 12 महिने केले आहे. याचा अर्थ डॉलर लवकर देशात येईल.
5. जुन्या अडकलेल्या व्यवहारांसाठी बँकांनाच अधिकार
1 ऑक्टोबर 2026 आधीचे जे आयात निर्यातीचे व्यवहार RBI च्या परवानगीसाठी अडकले होते ते आता Authorized Dealer बँकाच सोडवू शकतील, RBI कडे जायची गरज नाही.
तुमची आधीची FD असेल तर तिच्या व्याजावर काहीही परिणाम होणार नाही. ती ज्या दराने केली आहे त्याच दराने चालू राहील. नवीन बल्क FD करणाऱ्यांना आता रोज सकाळी दर चेक करून चांगला दर मिळेल की नाही हे पाहता येईल आणि बँकांची मनमानी बंद होईल.