वास्तुशास्त्र : घरात पैसा टिकत नाही, सारखी भांडणे होतात, याचे कारण घरातील ही 1 चूक असू शकते, वास्तुशास्त्र काय सांगते वाचा - टॉप न्यूज मराठी

घरात पैसा येतो, पण टिकत नाही. महिना संपायच्या आधीच पैसा संपतो. घरात छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणे होतात. मनाला शांतीच मिळत नाही. बऱ्याच वेळा याचे कारण आपल्या सवयी नसतात, तर घरातील एक छोटीशी चूक असते, असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे.

वास्तुशास्त्रानुसार घराचे मुख्य दार हे लक्ष्मीचे प्रवेशद्वार असते. जर मुख्य दाराजवळ चपला, बूट, कचरा, तुटलेल्या वस्तू पडलेल्या असतील, तर घरात नकारात्मक ऊर्जा येते. सकाळी उठल्यावर मुख्य दार स्वच्छ असले पाहिजे. दाराजवळ रोज पाणी शिंपडून रांगोळी काढली तर घरात सकारात्मक ऊर्जा वाढते.

दुसरी मोठी चूक म्हणजे स्वयंपाकघर आणि बाथरूम. स्वयंपाकघरात रात्री खरकटी भांडी ठेवून झोपणे, हे वास्तुशास्त्रात खूप अशुभ मानले जाते. रात्री खरकटी भांडी ठेवली की घरात दारिद्र्य येते, असे सांगितले जाते. तसेच बाथरूमचे दार नेहमी उघडे ठेवणे, याने पण पैसा टिकत नाही. बाथरूमचे दार नेहमी बंद ठेवावे.

तिसरी चूक म्हणजे घरात तुटलेल्या, बंद पडलेल्या वस्तू ठेवणे. बंद पडलेले घड्याळ, तुटलेला आरसा, फुटलेले भांडे, वापरत नसलेले जुने कपडे, या वस्तू घरात नकारात्मकता आणतात. घरात जितक्या जास्त नको असलेल्या वस्तू असतील, तितके घर जड वाटते. महिन्यातून एकदा तरी घरातील नको असलेल्या वस्तू बाहेर काढाव्यात.

चौथी चूक म्हणजे झोपण्याची दिशा. पाय दक्षिणेकडे करून झोपणे, किंवा मुख्य दाराकडे पाय करून झोपणे, याने झोप पूर्ण होत नाही. झोप पूर्ण झाली नाही की चिडचिड होते, आणि चिडचिड झाली की भांडणे होतात. डोके दक्षिणेकडे करून झोपावे, याने झोप शांत लागते, असे वास्तुशास्त्र सांगते.

या छोट्या चुकांबरोबरच एक उपाय पण आहे. घरात रोज संध्याकाळी दिवा लावावा. दिवा लावल्यावर घरात धूप, अगरबत्ती फिरवावी. आठवड्यातून एकदा तरी घरात मीठाच्या पाण्याने फरशी पुसावी. याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते.

पैसा टिकण्यासाठी फक्त वास्तू नाही, तर घरातील बोलणे पण महत्वाचे आहे. घरात जेवताना भांडण करणे, रागात बोलणे, याने पण लक्ष्मी नाराज होते, असे म्हटले जाते. घरात प्रेमाचे वातावरण असेल तर पैसा आपोआप टिकतो.