महत्वाची बातमी : 1 ऑक्टोबरपासून रेल्वेचा नवीन नियम लागू, एका तिकिटावर अनेक जण प्रवास करत असाल तर हे लक्षात ठेवा नाहीतर सगळ्यांना दंड बसणार - टॉप न्यूज मराठी

महत्वाची बातमी : मध्य रेल्वे 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवणार आहे. सणासुदीचा काळ सुरू होत आहे आणि दिवाळी, दसऱ्याला प्रवाशांची गर्दी वाढणार आहे, त्यामुळे आरक्षणाचा गैरवापर रोखण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. यामध्ये सवलतीचे तिकीट, ठराविक कोट्यातील तिकीट आणि रेल्वे पासवर प्रवास करणाऱ्यांची काटेकोर तपासणी केली जाणार आहे.

मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ स्वप्नील नीला यांनी काय सांगितले

त्यांनी सांगितले की जर तुम्ही सवलतीच्या दरात किंवा विशिष्ट कोट्यातून तिकीट काढले असेल तर तुमच्याकडे त्यासाठी लागणारे मूळ ओळखपत्र असणे बंधनकारक आहे. झेरॉक्स चालणार नाही, मूळ कागदपत्र दाखवावे लागेल. सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे एकाच पीएनआरवर अनेक प्रवाशांचे तिकीट असेल तर त्या पीएनआरवरील किमान एका प्रवाशाकडे मूळ ओळखपत्र असणे गरजेचे आहे. जर तपासणी दरम्यान एकाही प्रवाशाकडे मूळ ओळखपत्र मिळाले नाही तर त्या पीएनआरवरील सर्व प्रवाशांना विनातिकीट प्रवासी मानले जाईल आणि सगळ्यांकडून दंड वसूल केला जाईल.

कोणत्या तिकिटांची जास्त तपासणी होणार

1. सवलतीत काढलेले तिकीट - ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, विद्यार्थी सवलत

2. आरक्षण कोटा - लेडीज कोटा, तत्काळ कोटा, संसदीय कोटा

3. ई-पास आणि पीटीओवर प्रवास करणारे कर्मचारी - त्यांना प्रवास सुरू करण्याआधी पासवर सक्षम प्राधिकाऱ्याकडून शिक्का आणि सही घेतली आहे का हे तपासले जाईल आणि सोबत ओळखपत्र ठेवावे लागेल

4. अनारक्षित तिकीट - यूटीएसमधून काढलेल्या तिकिटाची वैधता तपासण्यासाठी टीटीई अॅपचा वापर केला जाणार आहे

ही मोहीम का राबवली जात आहे

  • मध्य रेल्वेने सांगितले की या मोहिमेचे चार उद्देश आहेत, आरक्षण सुविधांचा चुकीचा वापर थांबवणे, सवलत आणि पासचा गैरवापर रोखणे, बनावट तिकीट पकडणे आणि रेल्वेच्या महसुलाचे नुकसान टाळणे.
  • प्रवासासाठी कोणती ओळखपत्रे चालतील
  • रेल्वेने सांगितलेली मान्यताप्राप्त ओळखपत्रे

मतदान ओळखपत्र

  • पासपोर्ट
  • पॅन कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • केंद्र किंवा राज्य सरकारने दिलेले फोटो असलेले ओळखपत्र
  • शाळा किंवा कॉलेजचे फोटो असलेले विद्यार्थी ओळखपत्र
  • फोटो असलेले राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक
  • बँकेने दिलेले लॅमिनेटेड फोटो असलेले क्रेडिट कार्ड
  • आधार कार्ड

प्रवाशांसाठी सूचना - 1 ऑक्टोबरपासून प्रवास करताना ओरिजनल आधार किंवा इतर ओळखपत्र सोबत ठेवा, मोबाईलमधील फोटो किंवा झेरॉक्स दाखवू नका, नाहीतर दंड भरावा लागेल.