मोठी बातमी : पुणे कोर्टाबाहेर भरदिवसा गोळीबार आणि कोयता हल्ला, नेमकं काय घडलं? - टॉप न्यूज मराठी

पुणे : शिवाजीनगर कोर्टाच्या गेट क्रमांक 4 बाहेर आज दुपारी सव्वा एकच्या सुमारास थरार घडला. गेल्या काही दिवसांपासून कोर्टाला बॉम्बची धमकी येत असताना, याच परिसरात हत्या प्रकरणातील आरोपी मंदार किवळे याच्यावर हल्ला झाला.

दोन दुचाकीवरून आलेल्या पाच ते सहा जणांनी आधी त्याच्यावर गोळीबार केला. निशाणा चुकल्याने त्याने पळ काढला. आरोपींनी पाठलाग करून कोयत्याने सपासप वार केले. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. काही जण जखमी झाल्याचीही माहिती आहे.

हल्ल्यानंतर आरोपी पिस्तूल तिथेच टाकून फरार झाले. पोलिसांनी परिसर सील केला आहे. प्रत्यक्षदर्शींनी 100 आणि 108 वर फोन केला, पण फोन लागलाच नाही, असा दावा केला आहे. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.