कोल्हापुरात रविवारी मध्यरात्री थरार; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाने दोघा भावांना कारने दिली जोरदार धडक ; दोघांचा मृत्यू - टॉप न्यूज मराठी

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात रविवारी मध्यरात्री ड्रिंक अँड ड्राईव्हचा भीषण थरार उघडकीस आला आहे. गोकुळचे माजी संचालक रणजितसिंह पाटील यांचा मुलगा पद्मसिंह रणजितसिंह पाटील याच्या कारने दोघांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला आहे. अशी माहिती मिळते आहे.या घटनेने कोल्हापूर शहरात एकच खळबळ उडाली आहे.

ही घटना शिवाजी विद्यापीठ परिसरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पद्मसिंह पाटील मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने कार चालवत असतानाq त्यावेळी रस्त्यावरून जात असलेल्या उमेश पाथरुड आणि गणेश पाथरुड या दोन चुलत भावांना त्याच्या कारने उडवले. धडक इतकी जबरदस्त होती की दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर पद्मसिंहने कारसह घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच राजारामपुरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले.

या प्रकरणात राजारामपुरी पोलीस ठाण्यात पद्मसिंह पाटील याच्याविरोधात ड्रिंक अँड ड्राईव्ह, हिट अँड रन सह इतर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाच कुटुंबातील दोन भावांचा मृत्यू झाल्याने पाथरुड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर शहरात संतापाची लाट उसळली आहे. गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.