मुकेश अंबानींनी कर्मचाऱ्यांना दिले खास दिवाळी गिफ्ट, बॉक्स उघडताच निघाले सोने आणि चांदी, व्हिडिओ होतोय व्हायरल... - टॉप न्यूज मराठी

रिलायन्सच्या कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळीला मिळालेल्या गिफ्टची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरात सुरू आहे. कर्मचाऱ्यांनी स्वतःच या गिफ्टचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि तो व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या गिफ्ट बॉक्समध्ये सगळ्यात आधी आबोली रंगाची सुंदर पर्स दिसते. त्यावर दीपावलीच्या शुभेच्छा देणारे कार्ड ठेवले आहे. बॉक्स उघडल्यानंतर आत बदामाचे पॅकेट, एक सुंदर दिवा आणि पिस्ता रंगाची ब्रँडेड ओढणी ठेवलेली दिसते.

सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले ते बॉक्समधील एका छोट्या डबीने. या डबीमध्ये सोन्याची छोटी डबी ठेवली असून त्यात चांदीची गणेश मूर्ती आणि मंत्र ठेवण्यात आला आहे.

अनंत अंबानी यांच्या लग्नातील गिफ्टनंतर आता दिवाळी गिफ्टमुळेही रिलायन्स पुन्हा चर्चेत आले आहे. कर्मचाऱ्यांना मिळालेले हे खास गिफ्ट पाहून अनेक नेटकरी कौतुक करत आहेत तर काहींनी अंबानींच्या श्रीमंतीची चर्चा सुरू केली आहे.