पर्यटन विशेष : काश्मीरला फिरायला जाण्याचा प्लॅन करत आहात का ? चुकीचे दिवस निवडू नका नाहीतर पैसे वाया जातील, वाचा सविस्तर माहिती - टॉप न्यूज मराठी

पर्यटन विशेष : काश्मीरला पृथ्वीवरचा स्वर्ग म्हटले जाते. दरवर्षी लाखो पर्यटक काश्मीरला फिरायला जातात. पण अनेक लोक चुकीच्या महिन्यात काश्मीरला जातात आणि त्यामुळे त्यांना बर्फही दिसत नाही आणि पैसेही वाया जातात. त्यामुळे काश्मीरला जाण्याआधी कोणता महिना योग्य आहे हे माहित असणे गरजेचे आहे.

बर्फ पाहायचा असेल तर डिसेंबर ते फेब्रुवारी हा सर्वात चांगला काळ आहे. या काळात गुलमर्ग, सोनमर्ग, पहलगाममध्ये भरपूर बर्फ असतो. स्कीईंग आणि स्नो फॉलचा आनंद घ्यायचा असेल तर याच महिन्यात जा. पण या काळात थंडी खूप असते. तापमान उणे 5 ते उणे 10 अंशापर्यंत जाते. त्यामुळे गरम कपडे, हातमोजे, बूट सोबत घेऊनच जा.

मार्च ते जून या काळात काश्मीर वेगळेच दिसते. बर्फ वितळू लागतो आणि सगळीकडे हिरवळ आणि फुलं दिसतात. ट्युलिप गार्डन पाहायचा असेल तर एप्रिल महिना सर्वात चांगला आहे. या काळात दल सरोवरात शिकारा राईड, गुलमर्गमध्ये गोंडोला राईडचा आनंद घेता येतो. कुटुंबासोबत जायचे असेल तर हा काळ सर्वात आरामदायी असतो.

जुलै आणि ऑगस्टमध्ये काश्मीरला जाणे टाळा. या काळात पाऊस जास्त असतो आणि रस्ते बंद होण्याची शक्यता असते. तसेच भूस्खलनाचा धोका असतो.

खर्चाबद्दल बोलायचे झाले तर श्रीनगरला 5 दिवसांची ट्रिप साधारण 20 ते 25 हजार रुपयात होते. फ्लाईटचे तिकीट आधी बुक केले तर खर्च कमी होतो. हॉटेल ऑनलाईन बुक करा, तिथे गेल्यावर बुक केले तर पैसे जास्त लागतात.

काश्मीरला जाताना आधार कार्ड सोबत ठेवा. काही ठिकाणी चेकिंग होते. लोकल टॅक्सीवाल्याशी आधीच दर ठरवून घ्या. ही काळजी घेतली तर तुमची काश्मीर ट्रिप नक्कीच लक्षात राहील.