राजकीय किस्सा : दगडी चाळीतील 'डॅडी' आमदार झाला ! - टॉप न्यूज मराठी

राजकीय किस्सा : डोळ्यांसमोर दगडी चाळ आली की चटकन आठवतो तो अंडरवर्ल्डचा प्रवास, पोलिसांचे रेकॉर्ड आणि 'डॅडी' हे नाव. ज्या माणसाची ओळख आयुष्यभर गुन्हेगारी विश्वाशी जोडली गेली, तोच अरुण गवळी जेव्हा सर्वसामान्य जनतेच्या मतांवर थेट महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार पोहोचला, तोच हा 'किस्सा'

वर्ष होतं २००४ ​महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू होती. आणि या निवडणुकीत साऱ्यांचाच लक्ष लागलं होतं ते त्यावेळच्या चिंचपोकळी विधानसभा मतदारसंघात कारण या मतदारसंघातून अखिल भारतीय सेनेकडून अरुण गवळी निवडणुकीच्या मैदानात होता अर्थात अरुण गवळीसाठी ही पहिलीच निवडणूक नव्हती. याच वर्षी मे महिन्यात त्याने मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्याला ९२ हजारांहून अधिक मते मिळाली होती. त्यापैकी चिंचपोकळी विधानसभा क्षेत्रातून मिळालेल्या २३ हजारांहून अधिक मतांनी त्याचा आत्मविश्वास वाढला होता.

​आता त्याच्यासमोर चिंचपोकळीचे तत्कालीन काँग्रेस आमदार मधु चव्हाण यांचे तगडे आव्हान होते.  ​जेव्हा मतमोजणी झाली, तेव्हा डॅडी अरुण गवळी याने काँग्रेसच्या मधु चव्हाण याचा पराभव केला. डॅडी अरुण गवळीला ३१ हजार ९६४ मते मिळाली, तर मधु चव्हाण यांना २० हजार १४६ मते मिळाली. तब्बल ११ हजार ८१८ मतांच्या फरकाने विजय मिळवत डॅडी अरुण गवळी पहिल्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभेत पोहोचला.

 शब्दांकन संकेत देशपांडे