आरोग्य : महिलांनो रोज सकाळी रिकाम्या पोटी खा हे एक काळे फळ, मासिक पाळीच्या वेदना होतील गायब हाडे होतील पोलादी - टॉप न्यूज मराठी

आरोग्य : खजूर हे एक असे फळ आहे जे दिसायला छोटे असले तरी त्याचे फायदे खूप मोठे आहेत. विशेषतः महिलांसाठी खजूर हे वरदान मानले जाते. रोज सकाळी रिकाम्या पोटी खजूर खाल्ल्याने शरीराला ताकद आणि ऊर्जा मिळते. हृदय निरोगी राहण्यासाठी आणि हाडे मजबूत करण्यासाठी दररोज खजूर खाणे खूप महत्वाचे असल्याचे तज्ञ सांगतात.

महिलांनी रोज 5 खजूर का खावेत

रिसर्चमध्ये हे सिद्ध झाले आहे की महिलांनी रोज 5 खजूर खावेत. विशेषतः ज्या महिलांना मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना होतात, थकवा जाणवतो किंवा चक्कर येते त्यांनी रोज खजूर खायला हवे. खजुरामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्याने रक्ताची कमतरता दूर होते आणि वेदना कमी होण्यास मदत होते.

खजुरात काय असते

वाळलेल्या खजूरमध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट्स आणि फायबर असते. याव्यतिरिक्त त्यात अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. तसेच प्रथिने, कॅल्शियम, लोह, मँगनीज, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी 6 आणि सोडियम हे पोषक घटकही असतात. जे हिवाळ्यात शरीराला गरम ठेवण्यास आणि आराम देण्यास मदत करतात.

खजूर खाण्याचे जबरदस्त फायदे

खजूर खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होते. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करतात. त्यामुळे हृदय आणि फुफ्फुसाच्या आजारांपासून बचाव होतो. तसेच डोळे आणि पोटाशी संबंधित आजारांचा धोकाही कमी होतो. फ्लेव्होनॉइड्स नावाचे अँटीऑक्सिडंट मधुमेह, अल्झायमर आणि कर्करोगासारख्या आजारांपासून आराम मिळवण्यास मदत करते. खजूर खाल्ल्याने हाडे मजबूत होतात.

कसे आणि किती खावे

खजूर खाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे रात्री पाण्यात भिजवून ठेवणे. भिजवलेले 2 ते 3 खजूर सकाळी रिकाम्या पोटी खावेत. नंतर हळूहळू याचे प्रमाण 5 पर्यंत वाढवता येते. रिकाम्या पोटी खाल्ल्याने त्याचे पोषक घटक शरीरात लवकर शोषले जातात आणि दिवसभर ऊर्जा राहते.

महिलांनी दररोज सकाळी खजुराचे सेवन केल्यास अनेक आजार दूर राहण्यास मदत होईल.

डिस्क्लेमर - हा लेख सर्वसामान्य माहितीसाठी आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.