आरोग्य : चहा पिल्यानंतर लगेच पाणी पिणाऱ्यांनो सावधान, शरीरात होतो हा भयंकर बदल डॉक्टरांनी दिला इशारा - टॉप न्यूज मराठी

आरोग्य : सकाळी उठल्याबरोबर अनेकांना चहा लागतो. चहा पिल्यानंतर तोंडाला वेगळीच चव येते म्हणून अनेकजण लगेच पाणी पितात. पण ही सवय तुमच्या आरोग्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. चहा पिल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने शरीरात काय होते बघूया.

पचनक्रिया बिघडते

चहा गरम असतो आणि त्यानंतर तुम्ही थंड पाणी पिल्यास पोटातील तापमान अचानक बदलते. यामुळे पोटातील पाचक रस थंड होतात आणि अन्न पचायला जड जाते. रोज असे केल्याने अपचन, गॅस आणि अॅसिडिटीचा त्रास वाढतो. अनेकांना चहा पिल्यानंतर पोट फुगल्यासारखे वाटते त्याचे हेच कारण आहे.

दात खराब होतात

गरम चहा पिल्यानंतर लगेच थंड पाणी प्यायल्याने दातांच्या इनॅमलवर परिणाम होतो. गरम थंडचा एकत्र परिणाम झाल्याने दातांना तडे जाऊ शकतात. दात दुखणे आणि दात संवेदनशील होणे हा त्रास सुरू होतो. डेंटिस्ट नेहमी सांगतात की गरम खाल्ल्यानंतर लगेच थंड खाऊ नये.

सर्दी खोकला आणि घसा खराब

आयुर्वेदानुसार चहा गरम आहे आणि लगेच पाणी प्यायल्याने शरीरात कफ वाढतो. यामुळे घसा दुखणे, सर्दी आणि खोकला वारंवार होतो. ज्या लोकांना सतत घशाचा त्रास होतो त्यांनी ही सवय लगेच सोडावी.

कर्करोगाचा धोका

काही संशोधनात असे सांगितले आहे की खूप गरम चहा पिल्यानंतर लगेच थंड पाणी प्यायल्याने अन्ननलिकेवर सूज येते. रोज रोज असे झाल्यास अन्ननलिकेच्या कॅन्सरचा धोका वाढू शकतो. म्हणून डॉक्टर सांगतात की चहा आणि पाण्यामध्ये अंतर ठेवा.

काय करावे

चहा पिल्यानंतर कमीत कमी 30 ते 45 मिनिटे पाणी पिऊ नये. जर खूप तहान लागली असेल तर कोमट पाणी थोड्या वेळाने प्या. चहा पिताना तो खूप जास्त गरम पिऊ नका. कोमट झाल्यावर प्या. तसेच चहा पिल्यानंतर लगेच दात घासू नयेत.

ही छोटीशी सवय वाटत असली तरी त्याचा परिणाम मोठा होतो. आजपासूनच ही सवय बदला आणि आपले आरोग्य जपा.

डिस्क्लेमर - हा लेख सर्वसामान्य माहितीसाठी आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.