बीड जिल्हा सत्र न्यायालयात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्याने न्यायालय परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच बीड पोलीस, दंगल नियंत्रण पथक आणि बॉम्बशोधक पथक तातडीने न्यायालयात दाखल झाले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून न्यायालयातील सर्व कर्मचारी, वकील आणि पक्षकारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे.
बीड जिल्हा सत्र न्यायालयाला बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल प्राप्त झाला आहे. या मेलमुळे पोलीस प्रशासनाची धावपळ उडाली आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बीड पोलीस, दंगल नियंत्रण पथक आणि बॉम्बशोधक पथकाने न्यायालय परिसरात धाव घेतली आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने न्यायालयातील कर्मचारी, वकील आणि पक्षकारांना बाहेर काढण्यात आले असून संपूर्ण न्यायालय परिसराची बॉम्बशोधक पथकाकडून कसून तपासणी सुरू आहे.
दरम्यान, हा धमकीचा मेल कोणी पाठवला आणि त्यामागील नेमके कारण काय, याचा तपास पोलीस प्रशासनाकडून केला जात आहे. बीड न्यायालयातील बॉम्ब शोधमोहीम पूर्ण झाल्यानंतरच पुढील परिस्थिती स्पष्ट होणार आहे.
प्रतिनिधी : सोमनाथ मोटे सह शाम जाधव, बीड