दिलासादायक : पेट्रोल डिझेलच्या दरात मोठी घसरण होणार? सरकार घेणार हा मोठा निर्णय - टॉप न्यूज मराठी

सर्वसामान्य नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत पण आता लवकरच यामध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे भारत सरकारही पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याच्या तयारीत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात काय स्थिती आहे.

सध्या ब्रेंट क्रूड ऑइलचा भाव प्रति बॅरल 65 ते 70 डॉलरच्या आसपास आला आहे. काही महिन्यांपूर्वी हाच भाव 90 डॉलरच्या वर होता. रशिया युक्रेन युद्धामुळे आणि मध्य पूर्वेतील तणावामुळे कच्च्या तेलाचे भाव वाढले होते. पण आता अमेरिकेत तेलाचे उत्पादन वाढले आहे आणि ओपेक देशांनीही उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जागतिक बाजारात तेलाचा पुरवठा वाढला आहे आणि भाव कमी झाले आहेत.

सरकार कोणता मोठा निर्णय घेणार आहे.

केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलला GST च्या कक्षेत आणण्याचा विचार करत आहे. सध्या पेट्रोल डिझेलवर केंद्राचा एक्साईज ड्युटी आणि राज्यांचा व्हॅट लागतो, जो 50 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. जर पेट्रोल डिझेल GST मध्ये आले तर त्यावर जास्तीत जास्त 28 टक्के कर लागेल. यामुळे थेट 10 ते 15 रुपयांनी दर कमी होऊ शकतात. तसेच लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकार सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी एक्साईज ड्युटीमध्ये 3 ते 5 रुपयांची कपात करण्याचा विचार करत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

सामान्य माणसाला किती फायदा होणार.

जर सरकारने एक्साईज ड्युटी 5 रुपयांनी कमी केली तर पेट्रोलचा दर सध्या मुंबईत 104 रुपये आहे तो थेट 99 रुपयांवर येईल. डिझेलचा दर 90 रुपयांवर येईल. यामुळे केवळ गाडी चालवणाऱ्यांनाच नाही तर सर्वच वस्तूंच्या वाहतुकीचा खर्च कमी होईल आणि महागाई कमी होण्यास मदत होईल. ट्रान्सपोर्टर आणि शेतकऱ्यांना याचा सर्वात जास्त फायदा होणार आहे.

तज्ज्ञांच्या मते पुढच्या 15 ते 20 दिवसात सरकार याबाबत अधिकृत घोषणा करू शकते. तोपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीचा फायदा तेल कंपन्यांना होत आहे.

डिस्क्लेमर - सदर माहिती मीडिया रिपोर्ट्स आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील अंदाजावर आधारित आहे. पेट्रोल डिझेलचे अंतिम दर तेल कंपन्या आणि सरकार ठरवतात.