अध्यात्म : घराच्या मुख्य दरवाजावर या रंगाचा स्वस्तिक काढा, नकारात्मक ऊर्जा निघून जाईल - टॉप न्यूज मराठी

अध्यात्म : हिंदू धर्मात स्वस्तिक चिन्हाला खूप शुभ मानले जाते. कोणतेही शुभ कार्य सुरु करण्यापूर्वी स्वस्तिक काढले जाते. घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढल्याने घरात सुख समृद्धी येते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते अशी मान्यता आहे. पण वास्तुशास्त्रानुसार स्वस्तिक कोणत्या रंगाने काढावे हे खूप महत्त्वाचे आहे.

मुख्य दरवाजावर कोणत्या रंगाचा स्वस्तिक काढावा.

वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजावर लाल रंगाच्या कुंकवाने स्वस्तिक काढणे सर्वात शुभ मानले जाते. लाल रंग हा माता लक्ष्मी आणि शक्तीचा प्रतीक मानला जातो. लाल कुंकवाने काढलेला स्वस्तिक घरात सकारात्मक ऊर्जा घेऊन येतो. जर तुमच्या घराचा मुख्य दरवाजा उत्तर दिशेला असेल तर तुम्ही निळ्या रंगाचा स्वस्तिक देखील काढू शकता. यामुळे धनलाभ होतो.

स्वस्तिक काढण्याची योग्य पद्धत कोणती.

स्वस्तिक नेहमी उजव्या हाताने काढावे. सकाळी स्नान केल्यानंतर मुख्य दरवाजाची स्वच्छता करावी. दरवाजा पाण्याने पुसून घ्यावा. त्यानंतर कुंकवामध्ये थोडे गंगाजल मिसळून त्याने स्वस्तिक काढावे. स्वस्तिक काढताना त्याच्या चारही बाजूला चार छोटे ठिपके काढावेत. हे चार ठिपके चारही दिशांचे प्रतीक मानले जातात. स्वस्तिक काढल्यानंतर त्यावर अक्षता लावाव्यात.

स्वस्तिक काढल्याने काय फायदे होतात.

मान्यतेनुसार मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढल्याने घरात वास्तुदोष निघून जातो. घरात पैशाची अडचण येत नाही. कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद होत नाहीत. बाहेरची वाईट नजर आणि नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करत नाही. दर शुक्रवारी आणि दिवाळीच्या दिवशी नवीन स्वस्तिक काढल्यास त्याचे फळ अधिक मिळते असे सांगितले जाते. जर स्वस्तिक पुसट झाला असेल तर तो लगेच पुन्हा काढावा, अशुभ स्वस्तिक घरात ठेवू नये.

डिस्क्लेमर - सदर माहिती धार्मिक मान्यता, वास्तुशास्त्र आणि लोकश्रद्धांवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. या माहितीचा उद्देश केवळ माहिती देणे हा आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी वास्तुतज्ज्ञ किंवा जाणकार व्यक्तीचा सल्ला घ्यावा.