अध्यात्म : सोमवारी महादेवाला फक्त ही एक वस्तू अर्पण करा, सर्व इच्छा पूर्ण होतील - टॉप न्यूज मराठी

सोमवार हा महादेवाचा दिवस मानला जातो. या दिवशी महादेवाची मनोभावे पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे. अनेक लोक सोमवारी उपवास करतात आणि शिवलिंगावर अभिषेक करतात. पण तुम्हाला माहिती आहे का, सोमवारी महादेवाला एक विशिष्ट वस्तू अर्पण केल्याने त्याचे फळ अनेक पटीने वाढते.

सोमवारी शिवलिंगावर काय अर्पण करावे.

धार्मिक ग्रंथानुसार सोमवारी महादेवाला बेलपत्र अर्पण करणे सर्वात शुभ मानले जाते. बेलपत्र हे महादेवाला अत्यंत प्रिय आहे. जर तुम्ही शिवलिंगावर तीन पानांचे बेलपत्र अर्पण केले तर महादेव प्रसन्न होतात. पण बेलपत्र अर्पण करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, बेलपत्र कुठेही फाटलेले किंवा तुटलेले नसावे. स्वच्छ पाण्याने धुऊन मगच ते शिवलिंगावर अर्पण करावे.

बेलपत्रा व्यतिरिक्त आणखी एक वस्तू आहे जी सोमवारी अर्पण करणे खूप शुभ मानले जाते ती म्हणजे कच्चे दूध. सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करून शिवमंदिरात जावे. तिथे शिवलिंगावर कच्च्या दुधाचा अभिषेक करावा. दुधामध्ये थोडी साखर आणि काळे तीळ मिसळल्यास त्याचे फळ अधिक मिळते असे सांगितले जाते.

पूजा करण्याची योग्य पद्धत.

सोमवारी सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठावे. आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावे. घरातील शिवलिंग किंवा मंदिरातील शिवलिंगावर सर्वात आधी गंगाजलाने अभिषेक करावा. त्यानंतर कच्च्या दुधाने अभिषेक करावा. त्यानंतर बेलपत्र, पांढरी फुले, भस्म आणि चंदन अर्पण करावे. ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा. शेवटी महादेवाजवळ आपली इच्छा मनातल्या मनात बोलावी.

या उपायाने काय फळ मिळते.

मान्यतेनुसार सोमवारी हा उपाय केल्याने नोकरीतील अडथळे दूर होतात. वैवाहिक जीवनातील समस्या संपतात. आर्थिक अडचण दूर होते आणि घरात सुख शांती नांदते. ज्या लोकांच्या लग्नात अडथळे येत आहेत त्यांनी सलग 7 सोमवार हा उपाय केल्यास लवकर लग्न जुळते असेही सांगितले जाते.

 सदर माहिती धार्मिक मान्यता आणि लोकश्रद्धांवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. या माहितीचा उद्देश केवळ माहिती देणे हा आहे. यातील कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील जाणकार व्यक्तीचा सल्ला घ्यावा.