आरोग्य : चहा म्हटला की आपल्या डोळ्यासमोर येतो तो दुधाचा चहा. पण आरोग्याचा विचार करता गवती चहा म्हणजेच लेमन ग्रास टी हा सर्वोत्तम पर्याय आहे. आयुर्वेदात गवती चहाला औषधी वनस्पती म्हणून महत्त्व आहे. यामध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल, अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-कॅन्सर गुणधर्म आहेत. चला तर पाहूया याचे फायदे.
1. पचन तंत्र मजबूत होते
गवती चहामुळे पोटातील गॅस, अपचन, बद्धकोष्ठता, अतिसार आणि पोट फुगणे या समस्या दूर होतात. रोज सकाळी उपाशीपोटी गवती चहा घेतल्यास पचनक्रिया सुधारते.
2. वजन कमी करण्यासाठी उपयुक्त
गवती चहा मेटाबॉलिझम वाढवतो. शरीरातील अतिरिक्त फॅट बर्न करण्यास मदत करतो. वजन कमी करायचे असेल तर साखर न घालता गवती चहा घ्या.
3. अशक्तपणा आणि थकवा दूर होतो
यामध्ये लोह, कॅल्शियम आणि मॅंगनीज भरपूर आहे. लिंबू पिळून गवती चहा घेतल्यास रक्ताची कमतरता दूर होते आणि दिवसभर उत्साही वाटते.
4. हृदय निरोगी ठेवते
गवती चहा बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतो आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवतो. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
5. सर्दी, खोकला, तापावर रामबाण उपाय
पावसाळा आणि हिवाळ्यात सर्दी खोकल्यासाठी गवती चहा, आले आणि तुळस घालून उकळून प्यावा. यामुळे कफ कमी होतो आणि इम्युनिटी वाढते.
6. केस आणि त्वचेसाठी फायदेशीर
व्हिटॅमिन ए आणि सी असल्यामुळे केस गळणे थांबते, कोंडा कमी होतो आणि त्वचा उजळते.
7. एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढते
यातील अँटीऑक्सिडंट गुणधर्म मेंदूला ऑक्सिजन पुरवठा सुधारतात, त्यामुळे एकाग्रता वाढते.
कसा बनवावा गवती चहा?
एक कप पाण्यात 4 ते 5 गवती चहाची पाने, थोडे आले आणि तुळस टाकून 3 मिनिटे उकळा. गाळून त्यात मध किंवा लिंबू टाकून प्या. महागड्या औषधांपेक्षा स्वस्त आणि नैसर्गिक उपाय म्हणजे गवती चहा. रोजच्या आहारात त्याचा समावेश करा आणि निरोगी रहा.