आरोग्य : पितळ ग्लासमध्ये पाणी प्यायल्याने काय होतं ? तब्येतीवर होणारे ५ परिणाम - टॉप न्यूज मराठी

आरोग्य : पितळ हे तांबे आणि जस्त या दोन धातूंपासून तयार केले जाते. पितळाच्या भांड्यांमध्ये तांबे आणि जिंक या दोन्हींचे गुणधर्म असतात. भारतात पूर्वी पासूनच पितळाचे ग्लास, लोटा आणि प्लेट्सचा वापर केला जात आहे. खासकरून पूजेच्या साहित्यात, रोजच्या खाण्यापिण्याच्या पदार्थांसाठी पितळाच्या भांड्यांचा वापर केला जातो. पितळाच्या भांड्यांचा वापर चांगला आणि निरोगी मानला जातो.

पितळाच्या ग्लासमध्ये पाणी पिण्याचे फायदे

जेव्हा तुम्ही पितळाच्या ग्लासमध्ये पाणी पितात तेव्हा त्यात तांबे आणि जिंकचे घटकही असतात. जिंक इम्यून सिस्टिम चांगली ठेवण्यास मदत करते ज्यामुळे त्वचा हेल्दी ठेवण्यासही मदत होते. तर तांबे पचनक्रिया चांगली ठेवते. ज्यामुळे एकाच ग्लासमधून तुम्हाला 2 फायदे मिळतात. पितळाच्या ग्लासात पाणी प्यायल्याने गॅस, अपचन आणि पोट जड वाटणं या समस्यांपासून आराम मिळतो. सकाळी रिकाम्या पोटी पितळाच्या ग्लासात ठेवलेलं पाणी पिणं फायदेशीर मानलं जातं. ही एक सामान्य आयुर्वेदीक सवय आहे.

पितळातील तांबे आणि जिंक या दोन्हींमध्ये ओलिगोडायनामिक गुण असतात. ज्यामुळे हानीकारक बॅक्टेरिया कमी करण्यास मदत होते. पिण्याचं पाणी स्टोअर करण्यासाठी पितळ किंवा तांब्याच्या भांड्यांना महत्व द्या. रोज पितळाच्या बॉटलमध्ये पाणी प्यायल्याने शरीराला जिंकचा खुराक मिळतो. इम्युन सिस्टिम बळकट होते. बदलत्या वातावरणात ही सवय फायदेशीर ठरते. आयुर्वेदानुसार पितळाच्या ग्लासाने पाणी प्यायल्याने शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. त्वचा चमकते, केस चांगले दिसतात. हा कोणताही जादूई उपाय नाही तर एक सिंपल, नॅचरल सवय आहे.

पितळाच्या ग्लासातील पाणी कधी, कसं प्यावं?

सकाळी उठल्यानंतर पितळाच्या ग्लासात ठेवलेलं पाणी प्या. ग्लास रात्रभर पाण्याने भरून ठेवा. जेणेकरून मिनरल्स शोषून घेण्यास व्यवस्थित वेळ मिळेल. ग्लास हलक्या हाताने लिंबू आणि मीठाने स्वच्छ करा. जेणेकरून चमक आणि गुणवत्ता टिकून राहील. रात्री कमीत कमी ६ ते ८ तास पितळाच्या ग्लासमध्ये पाणी ठेवा.