मोठी बातमी : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यावरून वाद पेटला, कॉकरोच जनता पार्टीने घेतला मोठा निर्णय - टॉप न्यूज मराठी

नवी दिल्ली : कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच सीजेपीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अधिक तीव्र केली आहे. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण म्हणजेच एसआयआर प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप सीजेपीने केला आहे. या मागणीसाठी पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी या संदर्भात नवीन घोषणा केली आहे. अभिजीत दिपके, अभिनेते प्रकाश राज आणि यूट्यूबर ध्रुव राठी यांच्या नेतृत्वात बंगळुरूच्या फ्रीडम पार्क येथे पीपल्स ट्रिब्युनलचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी ज्ञानेश कुमार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि एसआयआर प्रक्रिया मागे घ्यावी या दोन मागण्या करण्यात आल्या आहेत. या आंदोलनानंतर चप्पल आंदोलनही केले जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

यापूर्वी झालेल्या आंदोलनाबद्दल सांगायचे तर दिल्लीतील जंतर-मंतर येथे सीजेपीने मोठे आंदोलन केले होते. दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतर हे आंदोलन स्थळ म्हणून अधिसूचित रद्द केल्यानंतरही आंदोलक तिथे पोहोचले होते. त्यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता, बॅरिकेडिंग लावले होते आणि सीजेपी नेते सौरव दास आणि आशुतोष रंका यांच्यासह अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले होते. या आंदोलनामुळे राजधानी दिल्लीत मोठा गोंधळ निर्माण झाला होता.

आता बंगळुरूनंतर पुन्हा दिल्लीत आंदोलन करण्याची तयारी सुरू असल्याने राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.