मनोरंजन विश्व : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते. तू झूठी मैं मक्कार चित्रपटाचे लेखक राहुल मोदी यांच्यासोबत तिच्या रिलेशनशिपच्या चर्चा गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहेत. दोघे जामनगरमध्ये अनंत अंबानीच्या प्री वेडिंग फंक्शनमध्ये एकत्र दिसले होते. त्यानंतर श्रद्धाने इंस्टाग्रामवर आर अक्षराचे लॉकेट घातलेला फोटो पोस्ट केला होता, तेव्हापासून लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या.
मध्यंतरी श्रद्धाने राहुल मोदी, त्याचे कुटुंब आणि त्यांच्या पाळीव कुत्र्यालाही इंस्टाग्रामवर अनफॉलो केले, तेव्हा ब्रेकअपची अफवा पसरली होती. अनेक मीडिया रिपोर्टमध्ये दोघांचे ब्रेकअप झाल्याचे सांगितले गेले.
या सर्व चर्चांवर श्रद्धा कपूरने आता अप्रत्यक्षपणे उत्तर दिले आहे. एका मुलाखतीत तिला लग्नाबद्दल विचारले असता ती म्हणाली, मी फेयरीटेल लव्हवर विश्वास ठेवते. मला आयुष्यात पूर्ण प्रेम हवे आहे, हाफ गर्लफ्रेंड वाला प्रकार मला नको. जेव्हा माझ्या आयुष्यात ते घडेल तेव्हा मी नक्कीच लग्नाचा विचार करेन, पण सध्या लग्नाचा प्रश्नच नाही.
यापूर्वी एका कार्यक्रमात ती म्हणाली होती, जर माझ्या आयुष्यात आशिकी 2 मधील राहुलसारखा पार्टनर आला तर मी तिथून पळून जाईन. मला एक्झिट कुठे आहे तेच शोधावे लागेल.
दरम्यान, ब्रेकअपच्या अफवांनंतर श्रद्धाने एका वडापाव डेटचा फोटो शेअर करत लिहिले होते, मला नेहमी असेच वडापावसाठी त्रास देत रहा, आणि राहुलला टॅग केले होते. त्यामुळे ब्रेकअपच्या चर्चा थांबल्या होत्या. तसेच दोघे अहमदाबादमधील एका लग्नाच्या रिसेप्शनमध्ये एकत्र दिसले होते, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
सध्या श्रद्धा तिच्या कामात बिझी आहे. स्त्री 2 नंतर ती आता स्त्री 3 आणि इतर काही मोठ्या प्रोजेक्टवर काम करत आहे. तिने स्पष्ट केले आहे की सध्या तिचे लक्ष करिअरवर आहे.